शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याचे खर्च भागविताना महापालिकेची तारेवरची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 16:48 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचा फटका औरंगाबाद महापालिकेलाही बसला असून मागील पाच महिन्यांमध्ये अपेक्षित उत्पन्न न आल्यामुळे तब्बल २५० कोटींची तूट निर्माण झाली आहे.

मुजीब देवणीकर

औरंगाबाद : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याचा फटका औरंगाबाद महापालिकेलाही बसला असून मागील पाच महिन्यांमध्ये अपेक्षित उत्पन्न न आल्यामुळे तब्बल २५० कोटींची तूट निर्माण झाली आहे. महापालिकेच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या  मालमत्ता कर आणि पाणीपट्टीतून  अत्यंत कमी उत्पन्न  मिळाल्याने मनपाचे आर्थिक नियोजन कोलमडले असून महिन्याचे खर्च भागविताना महापालिकेची  तारेवरची कसरत होत आहे.

मागील काही वर्षांपासूनच औरंगाबाद महापालिकेची अर्थस्थिती अत्यंत डळमळीत आहे. उत्पन्नापेक्षा  चारपट अधिक विकास कामे करण्यात आल्याने २४० कोटी रूपयांच्या विकास कामांची देयके प्रलंबित आहेत. दोन वर्षांपासून कंत्राटदारांना बिल न दिल्यामुळे नविन विकास कामे घेण्यास कुणीही तयार नाही. त्यामुळे  सध्या महापालिकेच्या निधीतून होणारी विकासकामेही ठप्प आहेत.

महापालिकेला मार्च महिन्यात मालमत्ता करातून कोट्यावधी रूपये मिळतात. विविध कार्यालयांकडून कर उपलब्ध होतो. कोरोनामुळे मात्र हा निधी अजूनपर्यंतही मिळालेला नाही. एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यात मालमत्ता करातून फक्त ३२ कोटी रूपये मिळाले असून १०० कोटी रूपये येणे मनपाला अपेक्षित होते. महापालिकेचा आर्थिक कणा असलेल्या नगर रचना विभागाकडूनही पाच महिन्यात फक्त १३ कोटी रूपये प्राप्त झाले. मालमत्ता विभागाने १ कोटी रूपयांची कमाई करून दिली असून मालमत्ता करातून उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात आल्याचे मुख्य लेखाधिकारी संजय पवार यांनी सांगितले. यातच भर म्हणून मागील ७ महिन्यांपासून पालिकेची ८० टक्के यंत्रणा कोरोनाच्या कामात व्यस्त आहे. कोरोनासाठी जिल्हा प्रशासनाकडून आतापर्यंत फक्त १४ कोटी रूपये महापालिकेला मिळाले. आणखी ३८ कोटी द्यावेत, अशी  मागणी महापालिकेने केली आहे.

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्था