शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
4
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
5
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
6
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
7
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
8
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
9
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
10
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
11
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
12
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
13
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
14
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
15
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
16
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
17
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
18
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
19
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
20
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड

भूमिगतच्या ठेकेदारास महापालिकेची नोटीस

By admin | Updated: February 9, 2016 00:32 IST

औरंगाबाद : काचीवाडा येथील बालकाच्या मृत्यूप्रकरणी महानगरपालिका प्रशासनाने सोमवारी खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या भूमिगत गटार योजनेच्या

औरंगाबाद : काचीवाडा येथील बालकाच्या मृत्यूप्रकरणी महानगरपालिका प्रशासनाने सोमवारी खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या भूमिगत गटार योजनेच्या ठेकेदार कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली. याप्रकरणी तातडीने खुलासा करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले आहेत. मनपाचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या आदेशावरून सोमवारी दुपारी ही नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. भूमिगत गटार योजनेच्या कामासाठी नाल्यात खोदलेल्या खड्ड्यात बुडून शनिवारी सायंकाळी काचीवाडा भागात आकाश जाधव या नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ठेकेदाराने नाल्यात सामान उतरविण्यासाठी याठिकाणची संरक्षक भिंत तोडली होती; परंतु नंतर ती बांधण्याचे किंवा त्याठिकाणी पत्रे अथवा लाकडी फळ्या लावण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे खेळता खेळता नाल्यात उतरून त्यातील खड्ड्यात पडल्याने आकाशचा मृत्यू झाला. याप्रकरणी नातेवाईकांच्या फिर्यादीवर रविवारी रात्री उशिरा सिटीचौक पोलीस ठाण्यात खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर मनपा प्रशासनानेही सोमवारी निष्काळजीपणाबद्दल कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मनपाचे प्रभारी आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या आदेशावरून दुपारी कंपनीच्या अधिकाऱ्यांना ही नोटीस देण्यात आली. यामध्ये कंपनीकडून काम करताना निष्काळजीपणा होत असून, ही निष्काळजी जीवित हानीला कारणीभूत ठरत असल्याचे म्हटले आहे. काचीवाडा प्रकरणात निष्काळजीपणा का झाला याचा खुलासा तातडीने करण्याचे आदेश या नोटिसीत देण्यात आले आहेत.(अधिकारी, पीएमसीवरही कारवाईची मागणी/२ वर)