शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

आयुक्तांचा महापालिका अधिकाऱ्यास दणका; प्लास्टिक लावलेला पुष्पगुच्छ दिल्याने लावला ५ हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 15:14 IST

पुष्पगुच्छास प्लास्टिक असल्याचे निदर्शनास येताच अधिकाऱ्यास ठोठावला दंड 

ठळक मुद्देनवनियुक्त आयुक्तांचा महापालिका पदाधिकाऱ्यांना दणकानगर रचना विभाग प्रमुखांना ५००० रुपये दंड 

औरंगाबाद : अस्तीक कुमार पांडये यांनी आज सकाळी १० वाजेच्या सुमारास महापालिका आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. यानिमित्ताने सर्व विभाग प्रमुखांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मात्र प्लास्टिकचे आवरण असलेला पुष्पगुच्छ एका अधिकाऱ्याने दिल्याचे निदर्शनास येताच आयुक्तांनी  त्यांच्याकडून तत्काळ ५००० रुपयाचा दंड वसूल करण्याचे आदेश दिले. 

अस्तित्व कुमार पांडेय यांनी आज औरंगाबाद महापालिका आयुक्त पदाचा पदभार घेतला. ते या आधी बीड येथे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते. या ठिकाणी प्रशासनात अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय असा त्यांचा नावलौकिक होता. हाच दरारा औरंगाबाद येथे पहिल्याच दिवशी दिसून आला असून आज पदभार स्वीकारल्यानंतर लागलीच याचा प्रत्यय आला. आयुक्तांनी पदभार स्वीकारताच सर्व विभाग प्रमुखांसोबत नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक आर. एस. महाजन यांनी आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मात्र, पुष्पगुच्छ बनविण्यासाठी प्लास्टिकचा वापर करण्यात आल्याचे लक्षात येताच आयुक्तांनी महाजन यांना तत्काळ ५००० रुपयाचा दंड आकारला. बीड इथे सुद्धा एका शासकीय कार्यक्रमात प्लास्टिकचे ग्लास वापरल्याचे लक्षात आले असता त्यांनी जिल्हा प्रशासनास दंड आकारला होता. 

नवनियुक्त आयुक्तांसमोरील प्रमुख मोठी आव्हाने :

१०० कोटीतील रस्त्यांची कामेमहाराष्ट्र शासनाने शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १०० कोटींचे अनुदान दिले आहे. या कामांची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे. मागील वर्षभरात महापालिकेला ३० रस्त्यांची कामे पूर्ण करता आलेली नाहीत. हा निधी संपला तर राज्य शासन आणखी २०० कोटी रुपये शहरातील रस्त्यांसाठी देणार आहे. शासनाकडून हा निधी मंजूर करून आणण्यासाठी प्रशासन, पदाधिकाऱ्यांना संपूर्ण शक्ती पणाला लावावी लागणार आहे.

घनकचऱ्याचे प्रकल्प उभारणेमहाराष्ट्र शासनाने घनकचऱ्याचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी १४८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. या निधीतून मागील दोन वर्षांत चिकलठाणा येथील एकमेव प्रकल्प मनपाला उभा करता आला आहे. पडेगाव, कांचनवाडी येथे काम सुरू आहे. हर्सूलची अद्याप निविदा प्रक्रियाच झालेली नाही. डेब्रीज वेस्टपासून गट्टू तयार करण्यासाठी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याचीही निविदा प्रसिद्ध केली नाही.

स्मार्ट सिटीचा निधी पडूनकेंद्र शासनाने चार वर्षांपूर्वी मनपाला २५० कोटी रुपये मनपाला स्मार्ट सिटी योजनेत दिले आहेत. या योजनेत महापालिकेने १०० शहर बस खरेदी केल्या आहेत. ४० कोटी रुपये या योजनेवर खर्च करण्यात आले आहेत. शहरात ७५० सीसीटीव्ही बसविण्याचा प्रकल्पही सुरू करण्यात आला आहे. याशिवाय स्मार्ट सिटी योजनेतील सर्व कामे रखडलेली आहेत.

रिक्त पदांचा अनुशेष वाढतोयमहापालिकेत बोटावर मोजण्याएवढेच अधिकारी शिल्लक आहेत. मागील १५ वर्षांमध्ये प्रशासनाने अनेक महत्त्वाच्या रिक्त पदांवर भरतीच केली नाही. मनपाच्या आस्थापनेवर मंजूर असलेली अनेक पदे रिक्त आहेत. शासनाकडून प्रतिनियुक्तीवर भरण्यात येणारी असंख्य पदे रिक्त आहेत. यामध्ये अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, शिक्षणाधिकारी, मुख्य लेखाधिकारी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, सहायक आयुक्त आदींचा समावेश आहे. 

सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा कोणत्या- वसाहतीमधील एखादी ड्रेनेज लाईन वाहत असेल तर महिनोन्महिने मनपा दुरुस्तीचे काम करीत नाही. वेळेवर मनपाने दुरुस्ती करावी.- शहरातील विविध वसाहतींमध्ये आजही सातव्या दिवशी, आठव्या दिवशी पाणीपुरवठा होत आहे. तीन दिवसांआड तरी पाणी मिळायला हवे.- परतीच्या पावसाने शहरातील प्रमुख रस्त्यांची दयनीय अवस्था करून ठेवली आहे. औरंगाबादकरांना दररोज खड्ड्यांमध्ये आदळआपट सहन करावी लागत आहे. किमान मनपाने पॅचवर्क तरी करायला हवे.- शहरात कचरा संकलन खाजगी कंपनीकडून करण्यात येत असला तरी अनेक वसाहतींमध्ये आजही कचऱ्याचे ढीग पडून आहेत. १०० टक्के  कचरा संकलन होत नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद