शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यविधीची तयारी सुरू असताना मयताची हालचाल; पाणीही पिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 00:26 IST

अंत्यविधीची सगळी तयारी झालेली. पार्थिवाला अंघोळ घालणार तोच मयताच्या शरीराची हालचाल झाल्याचे काहींना जाणवले. त्यामुळे जिवंत असल्याच्या शक्यतेने ग्लासने पाणी पाजण्यात आले. तोपर्यंत आलेल्या एका डॉक्टराने सदर व्यक्ती अजूनही जिवंत असल्याचे सांगताच शेकडो नातेवाईक पार्थिव घेऊन घाटीत पोहोचले. सदर व्यक्ती जिवंत असताना घाटीतील डॉक्टरांनी शुक्रवारी सकाळी मयत घोषित केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

ठळक मुद्देनातेवाईकांचा दावा : जिवंत असताना मृत घोषित केल्याचा आरोप; घाटीतील डॉक्टरांनी तपासून पुन्हा केले मयत घोषित

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अंत्यविधीची सगळी तयारी झालेली. पार्थिवाला अंघोळ घालणार तोच मयताच्या शरीराची हालचाल झाल्याचे काहींना जाणवले. त्यामुळे जिवंत असल्याच्या शक्यतेने ग्लासने पाणी पाजण्यात आले. तोपर्यंत आलेल्या एका डॉक्टराने सदर व्यक्ती अजूनही जिवंत असल्याचे सांगताच शेकडो नातेवाईक पार्थिव घेऊन घाटीत पोहोचले. सदर व्यक्ती जिवंत असताना घाटीतील डॉक्टरांनी शुक्रवारी सकाळी मयत घोषित केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे डॉक्टरांनी पुन्हा तपासणी केली. तेव्हा इसम मृत असल्याचे घाटीने पुन्हा घोषित केले.अप्पासाहेब जगन्नाथ दाभाडे (४५, रा. जयभीमनगर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. दाभाडे यांना लिव्हर फेल्युअर, सादूपिंडला सूज आदींमुळे उपचारासाठी २९ मार्च रोजी घाटीत दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना ५ एप्रिल रोजी प्रकृती खालावल्याने त्यांना ट्रामा विभागात दाखल केले. उपचार सुरू असताना शुक्रवारी पहाटे ४.१५ वाजेच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सकाळी ७ वाजेच्या सुमारास नातेवाईक मृतदेह घेऊन घरी गेले. अंत्यविधीची तयारी करण्यात आली. ठिकठिकाणचे नातेवाईक दाखल झाले. पार्थिवाला अंघोळ घालणार तोच त्यांची हालचाल सुरू आहे, नाडी सुरू असल्याचे काहींनी म्हटले आणि एकच धावाधाव सुरू झाली. नजीकच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. या डॉक्टरांनी मृत व्यक्ती जिवंत असल्याचे सांगताच नातेवाईकांनी मृत घोषित करणाऱ्या डॉक्टरांविषयी संताप व्यक्त करीत दुपारी १२ वाजेच्या सुमारास पुन्हा घाटी गाठली. अपघात विभागासमोर मोठ्या संख्येने नातेवाईक गोळा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.या घटनेची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी नातेवाईकांना शांत करीत सदर व्यक्तीची पुन्हा तपासणी करण्यासाठी वरिष्ठ डॉक्टरांना पाचारण केले. तोपर्यंत सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर, पोलीस निरीक्षक राजश्री आडे हेदेखील घाटीत पोहोचले. अनेस्थेशिया, सर्जरी, मेडिसिन विभागाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी वारंवार तपासणी करून खात्री केली. तेव्हा सदर व्यक्ती मृत असल्याचेच डॉक्टरांनी घोषित केले. यावेळी उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सय्यद अश्फाक, डॉ. आनंद बीडकर, डॉ. सुरेश हरबडे, डॉ. सरोजनी जाधव, डॉ. चंद्रकांत थोरात आदी वरिष्ठ डॉक्टर उपस्थित होते....तर गुन्हा दाखल होईलयाप्रकरणी नातेवाईकांची तक्रार आल्यावर डॉक्टरांवर थेट गुन्हा दाखल करता येणार नाही. प्रारंभी ही तक्रार अधिष्ठातांना देण्यात येईल. त्यांच्याकडून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईल. चौकशीमध्ये काही निष्काळजीपणा झाल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल केला जाईल.-गोवर्धन कोळेकर, सहायक पोलीस आयुक्त

टॅग्स :hospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबादdocterडॉक्टर