शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

भाड्याच्या गर्भाशयासाठी मुंबईकर औरंगाबादमध्ये

By संतोष हिरेमठ | Updated: August 5, 2022 10:23 IST

आठ महिन्यांपासून भाडोत्री गर्भाशय मिळणे थांबल्याचा दावा

- संतोष हिरेमठ लोकमत न्यूज नेटवर्क   औरंगाबाद : दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या शहरांतून ‘गर्भाशय भाड्याने मिळेल का’ अशी विचारणा करीत अनेक जण औरंगाबाद गाठत आहेत. मात्र, गेल्या आठ महिन्यांपासून गर्भाशय भाड्याने देण्याचा ‘उद्योग’ बंद असल्याचा दावा केला जात आहे. कारण  नव्या सरोगसी ॲक्टनुसार अंमलबजावणी करण्यासाठी डिसेंबर २०२१ पासून सरोगसी मदर्स होणे थांबले आहे. सध्या सरोगसी मदरसंदर्भात उपचार करणाऱ्या केंद्रांची नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. यावर  आता महापालिकेच्या आरोग्य विभागाची देखरेख राहणार आहे. यामुळे सरोगसी मदर्स उपलब्ध करून देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.  

बाॅलिवूडमधील काही अभिनेत्रींनी ‘सरोगसी’च्या माध्यमातून आई होण्याचे सुख प्राप्त केले. ‘सरोगसी’ म्हणजे दुसऱ्या महिलेचे गर्भाशय भाड्याने घेऊन तिच्या मदतीने अपत्य जन्माला घालणे होय. ज्या दाम्पत्याला काही कारणांमुळे मूल होऊ शकत नाही, त्यांना या माध्यमातून मूल  प्राप्त होऊ शकते; परंतु ‘सरोगसी’ काहींसाठी ‘धंदा’ बनला आहे. सरोगेट मदर्स उपलब्ध करून देणाऱ्या एजन्सी उदयास आल्या होत्या; परंतु  नवीन ॲक्टच्या माध्यमातून त्यावर अंकुश लागला आहे.   

गर्भपिशवी काढलेली असेल, गर्भाशय आतून खराब असेल, गर्भ राहत नसेल तर, अस्तर खराब असेल तर अशावेळी सरोगसी मदरची मदत घेतली जाते.  दिल्ली, मुंबईच्या तुलनेत औरंगाबादला उपचार परवडणारे आहेत. - डाॅ. मनीषा काकडे, वंध्यत्व निवारणतज्ज्ञ  

औरंगाबादेत २० सेंटर्स    सरोगसी मदर्ससंदर्भात उपचार करणारे औरंगाबादेत जवळपास २० सेंटर आहेत.     या सेंटरमध्ये केवळ उपचाराची जबाबदारी पार पाडली जाते. मात्र, दाम्पत्य आणि सरोगेट मदर्स तसेच एजन्सी यांच्यात होणारे आर्थिक व्यवहार या सेंटरबाहेरच होत असे, असे सांगण्यात आले.     प्रत्येकी एक सरोगसी मदर म्हटले तरी महिन्याकाठी, वर्षाकाठी हा आकडा, त्यातून होणारी आर्थिक देवाण-घेवाण ही जानेवारीपूर्वी किती होती, याचा अंदाज येतो. 

शासनच देईल मंजुरी ज्याप्रमाणे किडनी प्रत्यारोपणाची प्रक्रिया होते, त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासनाच्या देखरेखीत यापुढे ही सगळी प्रक्रिया होईल. सरोगसी मदर्स होण्यासाठी आता नातेवाईक, मैत्रीण असे लोक लागतील.  - डाॅ. अनुराधा शेवाळे, आयव्हीएफ कन्सल्टंट

अनेक दाम्पत्य प्रतीक्षेतअनेक दाम्पत्य सरोगसी मदर्सच्या माध्यमातून आई-बाबा होण्याच्या प्रतीक्षेत आहेत; परंतु जानेवारीपासून सरोगसी मदर्स होणे थांबले आहे. देशभर हीच परिस्थिती आहे.   - डाॅ. अपर्णा राऊळ, आयव्हीएफ स्पेशालिस्ट