शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील वतनी जमिनींत शिरला ‘मुळशी’ पॅटर्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 19:52 IST

२ लाख ६ हजार हेक्टरपैकी बहुतांश जमिनींचा व्यवहार बेकायदेशीर ?

ठळक मुद्देविभागातील आठही जिल्ह्यांत दलितांसाठी असलेल्या जमिनींत गैरव्यवहार विभागीय प्रशासनाने मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठविण्यासाठी पत्र व्यवहार

- विकास राऊत 

औरंगाबाद : मराठवाड्यात इनाम वतन, महार हाडोळा जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारात ‘मुळशी पॅटर्न’ शिरल्याची दाट शक्यता आहे. २ लाख ६ हजार हेक्टरपैकी बहुतांश जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याची शक्यता असून, या अनुषंगाने विभागीय पातळीवरील चौकशी रखडल्याची माहिती पुढे आली आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी २९ जून २०१९ पर्यंत सदरील प्रकरणात विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे.

विभागातील आठही जिल्ह्यांत दलितांसाठी असलेल्या महार हाडोळा, गायरान, सिलिंग, गावठाण, इनाम, देवइनाम, वतनाच्या जमिनीत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी विभागीय पातळीवर आल्या आहेत. खरेदी-विक्री व हस्तांतरणाचे सर्व व्यवहार रद्द करून सदरील जमिनी मूळ मालकांना परत करण्याबाबत डिसेंबर २०१७ पासून विभागीय प्रशासनाकडे तक्रारी येत आहेत. या प्रकरणात जिल्हाधिकारी व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणीही तक्रारीतून करण्यात आलेली आहे. मागील अडीच वर्षांपासून जमिनींच्या व्यवहारासंबंधी विभागीय प्रशासनाकडे चौकशीची मागणी केली जात आहे. परंतु प्रशासनाने अद्याप या प्रकरणात कुठलीही कार्यवाही केलेली नाही. दलितांसाठी शासनाने दिलेल्या जमिनी महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून बिगर दलित आणि बिगर आदिवासींना हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप तक्रारींतून केला  आहे. हा व्यवहार कोटींमध्ये झाल्याची शक्यता आहे. जमिनी आणि व्यवहारांची माहिती देण्याबाबत विभागीय आयुक्तांनी एक पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. विभागात वर्ग-२ आणि वतनी जमिनींचे व्यवहार बेलगामपणे सुरू आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे आणि देवेंद्र कटके यांच्यावर २०१८ मध्ये निलंबनाची कारवाईदेखील विभागीय आयुक्तांनी जमिनींच्या व्यवहारातूनच केली होती. तसेच उपजिल्हाधिकारी शेळके यांना जमिनीच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणातून सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई शासनाने केली आहे. 

प्रशासनाच्या पत्रांना दाद मिळेनाविभागीय प्रशासनाने मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना वतन व इतर जमिनींच्या व्यवहारातील संशयाच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारीनुसार अर्धशासकीय पत्रे पाठवून अहवाल मागविण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. परंतु आजवर कुणीही याबाबतचा अहवाल विभागीय प्रशासनाला सादर केलेला नाही. महसूल उपायुक्त डॉ.विजयकुमार फड यांनी १४ मे रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन अहवाल मागविला होता. त्यानंतर १२ जून रोजी विभागीय आयुक्तांनीही एक पत्र जारी केले आहे.  

टॅग्स :MarathwadaमराठवाडाRevenue Departmentमहसूल विभागCrime Newsगुन्हेगारी