शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

Mucormycosis : २ ते ९ जूनदरम्यानच्या म्युकरमायकोसिस रुग्णांची माहिती सादर करा : खंडपीठ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 12:50 IST

Mucormycosis : केंद्र शासनाने ११ ते ३१ मे दरम्यान महाराष्ट्राला म्युकरमायकोसिसचे ६८,३६० व्हायल इंजेक्शन्स दिले आहेत.

ठळक मुद्देमागील २० दिवसांपासून म्युकरमायकोसिसच्या ६६९ रुग्णांवर उपचार चालू ३८५ रुग्ण बरे झाले आणि १२४ रुग्णांचा मृत्यू

उपचार केलेले, बरे झालेले आणि मृत पावलेले रुग्ण किती, इंजेक्शन्सबाबतचा अहवाल द्या

औरंगाबाद : २ ते ९ जून २०२१ दरम्यान म्युकरमायकोसिसच्या किती रुग्णांवर उपचार करण्यात आले, किती रुग्ण बरे झाले, किती रुग्णांचा मृत्यू झाला. या रुग्णांच्या उपचारासाठी दररोज किती इंजेक्शनचा पुरवठा झाला, याची जिल्हावार माहिती पुढील सुनावणी वेळी म्हणजेच १० जून रोजी सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या .रवींद्र घुगे आणि न्या .बी.यू. देबडवार यांनी बुधवारी मुख्य सरकारी वकिलांना दिले .

सुनावणीवेळी केंद्र शासनातर्फे असिस्टंट सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी खंडपीठास सांगितले की, केंद्र शासनाने ११ ते ३१ मे दरम्यान महाराष्ट्राला म्युकरमायकोसिसचे ६८,३६० व्हायल इंजेक्शन्स दिले आहेत. देशातील इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र , कर्नाटक आणि गुजरातमध्ये म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असल्याचे त्यांनी सांगितले. इंजेक्शनची निर्मिती वाढविण्याचे निर्देश संबंधित कंपनीला दिले असून, येत्या २० ते २५ दिवसात इंजेक्शन निर्मिती वाढेल , अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली . सध्याच्या औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसह हैदराबाद येथील हाफकीन आणि एका कंपनीला परवाना दिला आहे. मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या मुख्य पीठापुढे म्युकरमायकोसिस संदर्भात ८ जूनला सुनावणी होणार आहे, असे त्यांनी मुंबईहून ऑनलाईन खंडपीठाला सांगितले . त्यामुळे औरंगाबाद खंडपीठात १० जूनला पुढील सुनावणी होणार आहे. न्यायालयाचे मित्र ॲड. सत्यजित बोरा यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की , प्रत्येक रुग्णाला दररोज ४ ते ५ इंजेक्शनची आवश्यकता असताना केवळ एक अथवा दोन इंजेक्शन दिले जात आहेत. आवश्यकतेपेक्षा ७० टक्के कमी पुरवठा केला गेला . अपूर्ण पुरवठ्यामुळे मराठवाड्यातील रुग्णांवर पुरेसे उपचार केले जात नाहीत. परिणामी १२४ रुग्णांचा मृत्यू झाला, याकडे त्यांनी खंडपीठाचे लक्ष वेधले .

केवळ ३० टक्केच पुरवठा ; खंडपीठाची चिंता आणि नाराजीमागील २० दिवसांपासून म्युकरमायकोसिसच्या ६६९ रुग्णांवर उपचार चालू असून , ३८५ रुग्ण बरे झाले आणि १२४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्य सरकारी वकील डी.आर. काळे यांनी खंडपीठास दिली. मराठवाड्याला ५०१७५ व्हायल्सची आवश्यकता असताना १६ ते ३० मे दरम्यान केवळ १३४२८ व्हायल्स म्हणजे आवश्यकतेच्या केवळ ३० टक्के इंजेक्शनचा पुरवठा झाला असल्याचे आजच्या सुनावणीत स्पष्ट झाले .त्यामुळे रुग्णांबद्दल चिंता व्यक्त करून इंजेक्शनच्या अपूर्ण पुरवठ्याबद्दल विशेष खंडपीठाने नाराजी व्यक्त केली .

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या