शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

Mucormycosis : अपुऱ्या इंजेक्शनमुळेच राज्यात म्युकरमायकोसिसचे अधिक मृत्यू; औरंगाबाद खंडपीठाची तीव्र नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 16:04 IST

Death due to Mucormycosis १० ते १५ जूनदरम्यान केंद्र शासन वाढीव इंजेक्शनचा पुरवठा करेल, अशी अपेक्षाही खंडपीठाने व्यक्त केली.

ठळक मुद्देकिती इंजेक्शनचा दररोज पुरवठा झाला ? माहिती देण्याचे केंद्र शासनाला निर्देश

औरंगाबाद : म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या उपचारासाठी केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला अँफोटेरेसीन बी इंजेक्शनचा कमी पुरवठा होत असल्यामुळे येथे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे, ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. बी. यू. देबडवार यांनी गुरुवारच्या सुनावणीत केंद्र शासनाच्या धोरणाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली.

१० ते १५ जूनदरम्यान केंद्र शासन वाढीव इंजेक्शनचा पुरवठा करेल, अशी अपेक्षाही खंडपीठाने व्यक्त केली. १० ते १५ जून २०२१ दरम्यान म्युकरमायकोसिसच्या किती रुग्णांवर उपचार करण्यात आले, त्यांच्यापैकी किती रुग्ण बरे झाले, किती रुग्णांचा मृत्यू झाला, याची माहिती मुख्य सरकारी वकिलांनी द्यावी. तसेच या रुग्णांच्या उपचारासाठी वरील कालावधीत किती इंजेक्शनचा पुरवठा झाला, याची माहिती पुढील सुनावणीच्या वेळी सादर करण्याचे निर्देश दिले. पुढील तारखेस सादर करण्याचे निर्देश देत पुढील सुनावणी १६ जून रोजी ठेवली आहे.

९ जूनपर्यंत मराठवाड्यात म्युकरमायकोसिसच्या १४८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्य सरकारी वकील डी. आर. काळे यांनी सुनावणीवेळी सादर केली. केंद्र शासनातर्फे असिस्टंट सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात अशाच एका जनहित याचिकेत पश्चिम विभागाच्या औषध उपनियंत्रक डॉ. रुबिना बोस यांनी शपथपत्राद्वारे माहिती सादर केली की, एप्रिल महिन्यात अँफोटेरेसीन बीचे उत्पादन ६२,००० वायल्स, मे मध्ये १,४०,००० वायल्स वाढले होते. जूनमध्ये ३,५७,६०० वायल्स उत्पादन अपेक्षित आहे. महाराष्ट्राला १ ते ९ जूनदरम्यान ५३,४५० वायल्स, ४ जूनला २३,११० वायल्स आणि ९ जूनला ३०,३४० वायल्सचा पुरवठा करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

राज्यात ६२८७ रुग्ण, ९ जूनपर्यंत १४८ रुग्णांचा मृत्यूम्युकरमायोसिसच्या प्रत्येक रुग्णाला दररोज ५ इंजेक्शन ४ ते ६ आठवडे द्यावे लागते. अपूर्ण पुरवठ्यामुळे त्याऐवजी प्रत्येक रुग्णाला केवळ १ अथवा २ इंजेक्शन दिले जातात, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे केंद्रशासनाने तातडीची पावले उचलून महाराष्ट्रासह इतर राज्यांना इंजेक्शनचा पुरवठा वाढविल्याशिवाय मृत्युदर कमी होणार नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे. महाराष्ट्रात मृत्यूदर वाढण्याचे प्राथमिक कारण अपूर्ण इंजेक्शनचा पुरवठा असल्याकडे न्यायालयाचे मित्र ॲड. सत्यजित बोरा यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ