शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

राज्यशासनाच्या MSSC कंत्राटी सुरक्षा रक्षकांच्या भरतीला ५० टक्के उमेदवार गैरहजर

By योगेश पायघन | Updated: August 20, 2022 16:58 IST

राज्य राखीव पोलीस बल गटाकडून मुल्यांकन, ७ हजार पदांसाठी भरती प्रक्रीयेला सुरूवात

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून ७ हजार कंत्राटी सुरक्षारक्षक पदासाठी भरती प्रक्रिया शनिवारी सकाळी सहा वाजता सुरू झाली. पहिल्या दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातील बोलावलेल्या दीड हजारपैकी केवळ साडेसातशे उमेदवारांची मैदानी चाचणीसाठी उपस्थिती होती. ५० टक्के उमेदवारांच्या उपस्थितीत शिस्तबद्ध नियोजनामुळे अवघ्या सात तासांत मैदानी चाचणीची प्रक्रीया पुर्ण झाली.

मार्च-एप्रिल २०२० मध्ये नियोजित भरती कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. ७ हजार पदांसाठी राज्यभरातून १ लाख ३३ हजार ६९३ युवकांनी अर्ज आलेले होते. भरतीसाठी मैदानी चाचणीची जबाबदारी राज्यातील ९ राज्य राखीव पोलीस बल गटाकडे देण्यात आली आहे. नियमीत भरतीचा अनुभव असल्याने एसआरपीएफचे शिस्तबद्ध नियोजनाची चुनुक दिसून आली. दीड हजार उमेदवार अग्नीवीर भरतीसाठीही बोलावण्यात येत आहेत. मात्र, ती प्रक्रीया बारा ते १८ तासांपेक्षा अधिक वेळखाऊ असल्याचे दिसून येत असतांना सुरक्षा रक्षक भरतीची प्रक्रीया सुलभतेने व जलदगतीने पार पडल्याचे उमेदवार म्हणाले.

औरंगाबाद येथील गट क्रमांक १४ येथे अनुक्रमे औरंगाबाद, लातूर, बुलडाणा व नांदेड येथील १९ हजार ३२२ तरुणांची मैदानी चाचणी व गुणांकन होणार आहे. दररोज १५०० उमेदवारांना बोलवण्यात आले असून ५ सप्टेंबरला शेवटची चाचणी होणार आहे. सकाळी सहा वाजता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याने सकाळी चार वाजेपासून उमेदवार सातारा परिसरात जमा होत आहेत. राज्य राखीव पोलीस बलाच्या गटाच्या प्रवेशद्वाराजवळ उमेदवारांसाठी टेन्टची, पाणी, माफक दरात नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली होती. समादेशक निमीत्त गोयल यांच्या मार्गदर्शनात पहिल्या दिवशीची प्रक्रीया सुटसुटीत व सुरळीत पार पडली.

सात तासांचे शिस्तबद्ध नियोजनबोलावण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी व हजेरी घेण्यासाठी पाच पथक होते. तर शाररीक मोजणी करण्यासाठी उंची, वजन, छाती असे प्रत्येकी चार पथके होती. त्यानंतर कागदपत्र पडताळणी करून पन्नासच्या गटाने कवायत मैदान परिसरात १६०० मीटर धावण्याची चाचणी झाली. सुरूवात व शेवटच्या पाॅईंटला दोन रुग्णवाहीका, आरोग्य पथकांची उपस्थिती होती. तर शेवटच्या पाॅईंटवर वेळेनुसार गुणांकन करण्यासाठी गट करण्यात आले होते. बारावीतील टक्क्यांनुसार ५० गुण तर मैदानी चाचणीचे ५० गुण अशा १०० गुणांच्या मुल्यांकन राज्य राखीव पोलीस दलाकडून एकत्रिक गेल्यावर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसState Governmentराज्य सरकार