शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

चुकीचे मीटर रीडिंग घेणाऱ्या कंत्राटदारांना महावितरणचा ‘शाॅक’;राज्यातील ६ एजन्सी बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2022 16:42 IST

कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक वीज मीटरचे रीडिंग १०० टक्के अचूक झालेच पाहिजे, असे निर्देश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत.

औरंगाबाद : महावितरणने वीज ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग अचूक होण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये चुकीचे मीटर रीडिंग घेऊन महावितरणच्या महसुलाचे नुकसान करणाऱ्या तसेच वीजबिल दुरुस्तीसाठी ग्राहकांना नाहक त्रास, मनस्ताप देणाऱ्या राज्यातील ६ मीटर रीडिंग एजन्सींना महावितरणकडून बडतर्फ करण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील २ तसेच औरंगाबाद, वसई, नांदेड व अकोला येथील प्रत्येकी एक, अशा ६ मीटर रीडिंग एजन्सीवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून, त्यांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.

कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक वीज मीटरचे रीडिंग १०० टक्के अचूक झालेच पाहिजे, असे निर्देश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी १ फेब्रुवारीला राज्यभरातील मीटर रीडिंग एजन्सी मालकांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. एजन्सीने केलेल्या मीटर रीडिंगची पडताळणी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सुरू करण्यात आली, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.

या एजन्सी बडतर्फआतापर्यंत झालेल्या पडताळणीमध्ये बारामती परिमंडळातील परिमल एंटरप्रायजेस, पांडरे, ता. बारामती (सासवड विभाग) व गणेश एंटरप्रायजेस, सादलगाव ता. शिरूर (केडगाव विभाग), कल्याण परिमंडळातील सुप्रीम पॉवर सर्व्हिसेस, अंधेरी (वसई विभाग), नांदेड परिमंडळातील महाराष्ट्र इलेक्ट्रिकल, दहेली ता. किनवट (भोकर विभाग), औरंगाबाद परिमंडळातील नंदिनी एंटरप्रायजेस (औरंगाबाद शहर विभाग २) आणि अकोला परिमंडळामधील अजिंक्य महिला बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्था (अकोला शहर विभाग) या ६ एजन्सीद्वारे सुरू असलेल्या मीटर रीडिंगच्या कामात कुचराई होत असल्याचे आढळून आले. परिणामी, या एजन्सीविरुद्ध थेट बडतर्फीची कारवाई करण्यात आली असून, काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे.

चूक एजन्सीची, मनस्ताप ग्राहकांनाया बडतर्फ एजन्सीकडून वीज मीटरचे चुकीचे रीडिंग घेणे व फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा हेतूपुरस्सर शेरा देणे, महावितरणला अचूक रीडिंग घेत असल्याची खोटी माहिती देणे आदी. प्रकार होत असल्याचे दिसून आले. यामुळे महावितरणच्या महसुली नुकसानीसोबतच वीज ग्राहकांना देखील चुकीच्या वीज बिलांच्या दुरुस्तीसाठी मनस्ताप व त्रास झाल्याचे दिसून आले. त्याची गांभीर्याने दखल घेत महावितरणकडून मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादelectricityवीज