शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

घाटी रुग्णालयातील ९०० रुपयांत एमआरआय योजना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 14:23 IST

सवलत मिळणे बंद झाल्याने ‘एमआरआय’साठी दोन हजार रुपयांचा भुर्दंड बसत आहे. 

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) गोरगरीब रुग्णांना नऊशे रुपयांत एमआरआय मिळणे बंद झाले आहे. जिल्हा नियोजन समितीतून नावीन्यपूर्ण योजनेत मिळालेल्या निधीचा ३१ मार्चपूर्वी हिशोब देण्यासाठी ही योजना सहा दिवसांपूर्वीच बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना सवलत मिळणे बंद झाले असून, ‘एमआरआय’साठी दोन हजार रुपयांचा भुर्दंड बसत आहे. 

वर्ष २०१५-१६ मध्ये तत्कालीन पालकमंत्र्यांनी डीपीसीमधून सातशे रुपयांत एमआरआय मिळण्यासाठी ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. १० सप्टेंबर २०१५ रोजी मिळालेल्या निधीला जानेवारी २०१६ मध्ये खर्चाची मान्यता मिळाली. त्यामुळे पहिल्या वर्षी केवळ ८५ रुग्णांंच्या तपासण्या या योजनेतून होऊ शकल्या. ९३ हजार ५०० रुपये खर्च झाला आणि ४९ लाखांचा निधी त्यावर्षी परत गेला. त्यानंतरच्या वर्षात निधीअभावी ही योजना बंद होती.

२०१७-१८ मध्ये २० लाखांचा निधी डीपीसीतून मंजूर झाला. आॅगस्ट २०१७ मध्ये ही योजना परत सुरू झाली. मार्च २०१८ पर्यंत ९४९ रुग्णांना लाभ मिळाला. यासाठी ११ लाख रुपयांचा निधी खर्च झाला. ९ लाखांचा निधी परत गेला. त्यानंतर २०१८-१९ साठी २ एप्रिलला घाटी प्रशासनाने २५ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली. निधीचा मार्ग मोकळा झाला. ‘एमआरआय’साठी १,८०० ते २,५०० रुपये मोजण्याची वेळ गोरगरीब रुग्णांवर येत होती. नावीन्यपूर्ण योजनेमुळे सातशे रुपयांत गोरगरिबांना एमआरआय मिळण्यास सुरुवात झाली. पुढे शुल्क वाढीमुळे सातशेवरून नऊशे रुपये झाले. या योजनेमुळे रुग्णांचे अकराशे रुपये वाचत होते. 

या योजनेत मंजूर झालेल्या यंदाच्या आर्थिक वर्षातील निधी ३१ मार्चनंतर परत जाऊ नये, उरलेला निधी पुढे वापरता यावा, यासाठी किती निधी उरला आहे, त्याचा हिशोब करून निधी पुढे वापरण्यास परवानगी मिळविण्यासाठी २५ मार्च रोजीच योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना एमआरआयसाठी दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत. 

...तर पुन्हा योजनायोजनेतील निधी पुढे वापरू द्यावा, यासाठी ट्रेझरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबर पत्र्यव्यवहार केला जात आहे. ही मंजुरी मिळाली, तर पुन्हा या योजनेतून ‘एमआरआय’साठी सवलत दिली जाईल. ३१ मार्च रोजी किती निधी उरला हे सांगता येत नाही. त्यामुळे २५ मार्चपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात आली.-डॉ. कैलास झिने,वैद्यकीय अधीक्षक, घाटी रुग्णालय

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीfundsनिधीAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद