शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

खासदारांचा ट्वीटरवर, तर आमदारांचा फेसबुकवर धुरळा; सोशल मीडियातून लोकप्रतिनिधी जनसंपर्कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 16:27 IST

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर थेट सोशल होण्याऐवजी सोशल मीडियातून लोकप्रतिनिधी जनसंपर्काकडे वळले आहेत.

ठळक मुद्दे खासदार करताहेत विविध विषयांवर रोज ट्वीट काही आमदारांचा सोशल मीडियात संपर्कच नाही

- विकास राऊत

औरंगाबाद : जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सोशल मीडियात राजकारण आणि समाजकारणाचा धुरळा उडवित आहेत. त्यात खासदार फेसबुक आणि ट्वीटरवरवर, तर काही आमदार केवळ फेसबुकवरच सक्रिय आहेत.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर थेट सोशल होण्याऐवजी सोशल मीडियातून लोकप्रतिनिधी जनसंपर्काकडे वळले आहेत. जिल्ह्यात विधानसभेवर निवडून गेलेले ९ आमदार आहेत. लोकसभेवर १ आणि राज्यसभेवर १ खासदार आहे. राज्य सरकारमधील दोन मंत्री जिल्ह्यात असून एक केंद्रीय राज्यमंत्री आहेत. एमआयएम ( MIM ) आणि भाजपा (BJP ) खासदारांचे ट्वीटरवर हॅण्डल रोज अपडेट असते, तर आमदारांमध्ये भाजपाचे लोकप्रतिनिधी ट्वीटरवर आणि फेसबुकवर सक्रिय आहेत. शिवसेनेत एक-दोन आमदार वगळता दोन्ही माध्यमांवर कुणीही जास्त सक्रिय नाही. बहुतांश आमदारांनी स्वत:चे फेसबुक पेज तयार केले आहे.

कोण अ‍ॅक्टिव्ह, कोण इनअ‍ॅक्टिव्हरोहयो मंत्री संदिपान भूमरे ( Sandipan Bhumare ) सोशल मीडियात अ‍ॅक्टिव्ह आहेत. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) हे फक्त फेसबुकवर अपडेट आहेत. माजी विधानसभा अध्यक्ष आ. बागडे ( Haribhau Bagade ) यांचे ट्वीटरवर खाते आढळून आले नाही. तसेच शिवसेनेचे आ. राजपूत, आ. बोरनारे यांचेही खाते ट्वीटरवर आढळले नाही.

केंद्रीय राज्यमंत्र्यांचे रोज ट्वीटकेंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड ( Bhagvat karad ) हे मंत्री झाल्यापासून रोज ट्वीटरवर अपडेट होत आहेत. जिल्ह्याच्या विविध मागण्यांबाबत केंद्र सरकारकडे ते करीत असलेला पाठपुरावा ते ट्वीट करतात.

खासदारांचे फॉलोअर्स जास्तखा. इम्तियाज जलील (  Imtiaz Jalil ) यांचे ट्वीटरवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. ते फेसबुकवर सुध्दा सक्रिय असून त्यांच्या प्रत्येक पोस्टला समर्थकांकडून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते. ते रोज ट्वीट करतात हे विशेष.

ट्वीटरवर जैस्वाल पिछाडीवरशिवसेनेचे आ. जैस्वाल ( Pradip jaiswal ) फेसबुकवर अ‍ॅक्टिव्ह असले तरी, ते ट्वीटरवर मागे पडले आहेत. तसेच आ. बंब ( Prashant Bamb ) ट्वीटरवर मागे आहेत. त्यांचे फॉलोअर्स देखील कमी आहेत.

जवळपास सर्वांचीच वॉररूमसोशल मीडियातील जनसंपर्क सांभाळण्यासाठी सगळ्या लोकप्रतिनिधींनी वॉररूम केलेली आहे. काही लोकप्रतिनिधी स्वत: ट्वीट करतात हे विशेष.

खा. इम्तियाज जलीलफेसबुक - ३१५३ट्वीटरवर - १ लाख ५६ हजार

खा. डॉ. भागवत कराडफेसबुक - ७२८१९ट्वीटरवर - १० हजार

औरंगाबाद पूर्व आ. अतुल सावेफेसबुक - ४७४९ट्वीटर - ४७१९

औरंगाबाद मध्य- आ. प्रदीप जैस्वालफेसबुक - ६१४२ट्वीटर - ४८०

औरंगाबाद पश्चिम- आ. संजय शिरसाटफेसबुक - ४३१४ट्वीटर - ५१२७

पैठण- आ. संदिपान भूमरेफेसबुक - ५२१२ट्वीटर - ४७७०

गंगापूर - आ. प्रशांत बंबफेसबुक - १५८५९ट्वीटरवर - ४२

वैजापूर - आ. रमेश बोरनारेफेसबुक - ३३६४ट्वीटर - खाते आढळले नाही

कन्नड - आ. उदयसिंग राजपूतफेसबुक - ४९५२ट्वीटर - खाते आढळले नाही

सिल्लोड - आ. अब्दुल सत्तारफेसबुक - ६०३२ट्वीटर - खाते आढळले नाही

फुलंब्री - आ. हरिभाऊ बागडेफेसबुक - १३०००ट्वीटर - खाते आढळले नाही 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाBhagwat Karadडॉ. भागवतImtiaz Jalilइम्तियाज जलीलPradeep Jaiswalप्रदीप जैस्वालAtul Saveअतुल सावेAbdul Sattarअब्दुल सत्तार