लहुजी क्रांती सेनेचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:05 AM2017-11-10T00:05:46+5:302017-11-10T00:05:54+5:30
तेलंगणा राज्यात आंदोलकांवर हल्ला केल्याच्या प्रकरणात पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने गुरुवारी परभणीत संस्थापक अध्यक्ष राधाजी शेळके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तेलंगणा राज्यात आंदोलकांवर हल्ला केल्याच्या प्रकरणात पोलीस अधिकारी व कर्मचाºयांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने गुरुवारी परभणीत संस्थापक अध्यक्ष राधाजी शेळके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
तेलंगणा राज्यात अ, ब, क, ड आरक्षणासंदर्भात भारतीदीदी मादिगा यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. पोलिसांनी लाठीमार करीत हे आंदोलन उधळून लावले. यात भारतीदीदी यांचे निधन झाले.
या घटनेचा निषेध नोंदवत लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले. शहीद भारतीदीदी यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, त्यांच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अनुसूचित जातीत अ, ब, क, ड आरक्षण वर्गीकरण करुन मातंग, मादिगा समाजाला आरक्षण द्यावे, हैदराबादचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकाºयांना निलंबित करावे आदी मागण्या करण्यात आल्या. या आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब साबळे, बन्सीलाल भंडारी, प्रा.अंकुश कांबळे, शंकर पवार, शिवाजी शेळके, रोहिदास खंदारे, गणेश घोडे, संतोष थोरात, गोपीनाथ चिटके, दत्तराव कांबळे, पांडुरंग कांबळे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.