नवीन नांदेड : आॅटोरिक्षा व टॅक्सीच्या परवान्याची वाढीव शुल्क व दंडाची रक्कम रद्द करण्याच्या मागणीसाठी आॅटो चालक-मालक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने ४ मार्च रोजी आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या आंदोलनास आॅटो चालक-मालक व टॅक्सी वाहनधारकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाकडून आॅटोरिक्षा व टॅक्सी वाहनांच्या परवान्याची शुल्क तसेच दंडाची रक्कम नुकतीच वाढविण्यात आली आहे. परिवहन विभागाकडून वाढविण्यात आलेली परवान्याची वाढीव शुल्क व दंडाची रक्कम रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आॅटोरिक्षा चालक -मालक संघटनेच्या ‘संयुक्त कृती समिती’चे प्रदेश उपाध्यक्ष नरेंद्र गायकवाड व वैजनाथ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आंदोलनात संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बालाजी कोकरे, सचिव मो. आरोफ खाँ पठाण, संपर्कप्रमुख मिर्झा नवाब बेग, उपाध्यक्ष शेख अजिज, माधव गायकवाड, नामदेवराव पांचाळ, विनोद वंजारे, चंद्रकांत गाजरे, उद्धव एडके व नितीन गिरडे आदी उपस्थित होते़ (वार्ताहर )
आॅटोचालकांचे आंदोलन
By admin | Updated: March 4, 2016 23:26 IST