शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

नोटाबंदीविरोधात आंदोलन

By admin | Updated: January 9, 2017 23:30 IST

लातूर : शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी सकाळी ११ वाजता गांधी चौकात थाळीनाद आंदोलन करण्यात आले.

लातूर : नोटाबंदीनंतर देशात आर्थिक आणीबाणी निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे सामान्य जनता हैराण झाली असताना पंतप्रधानांचे मौन आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या विरोधात शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी सकाळी ११ वाजता गांधी चौकात थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते सहभागी होते.चलनातून पाचशे-हजारांच्या नोटा रद्द केल्यामुळे देशातल्या सर्वसामान्य जनतेला मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. रोजगार मिळत नाही. बाजारातील व्यवहार ठप्प झाला आहे. शेतीमालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना बियाणे वेळेवर मिळले नाही. त्यामुळे रबीचा पेराही वेळेत झाला नाही. व्यापारी पैसा नसल्यामुळे शेतकऱ्यांचा माल खरेदी करीत नाही. केवळ चलन तुटवडा असल्यामुळे ही परस्थिती ओढवली आहे. नोटबंदीचा निर्णय घेताना नियोजन न केल्यामुळे सामान्य नागरिकांना ५० दिवसांनंतरही गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप आंदोलनादरम्यान करण्यात आला. दरम्यान, शहर जिल्हा काँग्रेसने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. थाळीनाद आंदोलनात एआयसीसीचे निरीक्षक ए.पी. बसवराज, जिल्ह्याचे प्रभारी प्रा. टी.पी. मुंडे, महापौर अ‍ॅड. दीपक सूळ, शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख, केशरबाई महापुरे, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा सपना किसवे, महेश काळे, अत्ताफ शेख, रत्नदीप अजनीकर, गणेश भोसले, बिरबल देवकते, अ‍ॅड. सय्यद शफी, नेताजी बादाडे, भानुदास डोके, दगडूपा मिटकरी, समद पटेल, सिकंदर पटेल, रमेशअप्पा हलकुडे, चंद्रकांत धायगुडे, अ‍ॅड. देवीदास बोरूळे, सुपर्ण जगताप, कैलास कांबळे, युनिस मोमीन, अ‍ॅड. फारूक सय्यद, मीनाताई सूर्यवंशी, सुकेशनी मुस्कावाड, रेखा नावंदर, ज्योती आवस्कर, श्रीदेवी औसेकर, आशा स्वामी, योजना कामेगावकर आदींचा सहभाग होता.लातूर : अर्थ व्यवस्थेतील काळा पैसा नष्ट करण्याच्या उद्देशाने पाचशे-हजारांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधानांनी घोषित केल्यानंतर राष्ट्रवादीने या निर्णयाचे स्वागत केले. परंतु, उद्भवणाऱ्या परिस्थितीवर पूर्व तयारी केली नाही. त्याच्या निषेधार्थ राकाँच्या वतीने लातुरात सोमवारी जनआंदोलन करण्यात आले.चलनबंदीमुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर पूर्व तयारी न केल्यामुळे देशातील करोडो नागरिकांना आर्थिक ताण सोसावा लागला. त्यामुळे देशाची कृषीविषयक आघाडी मोडकळीस आली. शेतकरी, कष्टकरी, असंघटित कामगार, शेतमजुरांना हालअपेष्टांना सामोरे जावे लागले. बी-बियाणे, औषधी मिळणे मुश्किल झाले. दुष्काळामुळे आधीच्या हंगामातील पिके हातची गेली आणि या हंगामात रोखीचा व्यवहार थांबला. यामुळे शेतकरी अडचणीत आला. केवळ शासनाच्या या धोरणामुळे जनतेला मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. मजुरांवर रोजीरोटीचा प्रसंग आला, असे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.जनतेला स्वत:चा पैसा मिळणेसुद्धा अवघड होऊन बसले. गृहिणींना घर कसे चालवावे, याचा त्रास सहन करावा लागला. एक तर नोटा बंद झाल्या. दोन हजाराची नवीन नोट चलनात आली. परंतु, त्याचे चिल्लरचे वांदे आले. यामुळे आर्थिक व्यवहार कोलमडून गेले. एक प्रकारची ही आर्थिक आणीबाणीच शासनाने जनतेवर लादली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला. आंदोलनात मकरंद सावे, प्रशांत पाटील, अशोक गोविंदपूरकर, मुर्तुजा खान, राजासाब मणियार, पप्पूभाई कुलकर्णी, शैलेश स्वामी, सय्यद इब्राहीम, अ‍ॅड. किरण बडे, रेखाताई कदम, संजय सोनकांबळे, दिलीप सोनकांबळे, राजेंद्र इंद्राळे, नवनाथ आल्टे आदी सहभागी झाले होते. (आणखी वृत्त / हॅलो ४ वर)