शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

अडचणींचा डोंगर : कारखान्यांच्या चाकांची गती अद्याप मंदावलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 20:00 IST

पूर्ण ताकदीने उत्पादन सुरू करण्यासाठी आॅर्डर, वाहतूक, कच्च्या मालाचा सुरळीत पुरवठा आणि कामगारांची कमतरता ही उद्योगांसमोरील मोठी आव्हाने आहेत. 

ठळक मुद्देमनुष्यबळाच्या कमतरतेमुळे पूर्वपदावर येण्यासाठी लागणार दोन महिन्यांचा कालावधी सध्या देशभरातील मार्केट  काही प्रमाणात मार्केट सुरू झाले असले, तरी अजून मालाला पाहिजे तसा उठाव नाही

औरंगाबाद : प्रशासनाने घालून दिलेले नियम, अटींचे पालन करून शहर आणि परिसरतील पाच औद्योगिक वसाहतींमधील उद्योग सुरू झाले असले, तरी कच्चा माल, दळणवळण, पुरेशा प्रमाणात आॅर्डर व मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे महिनाभरापासून उद्योगांची गती मंदावलेलीच आहे. 

लॉकडाऊनमुळे ४० दिवस देशभरातील उद्योगांची चाके थांबली होती. अलीकडे काही नियम व अटींवर शासनाने उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार जवळपास महिनाभरापासून शहर आणि परिसरतील शेंद्रा, वाळूज, चिकलठाणा, रेल्वेस्टेशन, पैठण रोड व पैठण या पाच औद्योगिक वसाहतींमधील उद्योग सुरू करण्यासाठी परवानगी दिली. या पाचही औद्योगिक वसाहतींमधील सूक्ष्म, लघु, मध्यम व मोठे, असे मिळून एकूण ५ हजार उद्योग आहेत. यापैकी सध्या ४ हजार ३०० उद्योग सुरू झाले आहेत. मात्र, पूर्ण ताकदीने उत्पादन सुरू करण्यासाठी आॅर्डर, वाहतूक, कच्च्या मालाचा सुरळीत पुरवठा आणि कामगारांची कमतरता ही उद्योगांसमोरील मोठी आव्हाने आहेत. 

सध्या देशभरातील मार्केट  काही प्रमाणात मार्केट सुरू झाले असले, तरी अजून मालाला पाहिजे तसा उठाव नाही. त्यामुळे उत्पादन वाढविण्यावर उद्योगांना मर्यादा आलेल्या आहेत. सध्या अवघ्या ४० टक्के क्षमतेने उत्पादन काढले जात आहे. पुरेशा आॅर्डर नसल्यामुळे उद्योजक चिंतेत आहेत. कच्चा माल आता उपलब्ध आहे; पण वाहतूक व्यवस्था (ट्रान्स्पोर्टिंग) पूर्ण क्षमतेने नसल्याने उत्पादित माल बाहेर पाठविण्यावर आणि कच्चा माल आणण्यावर मर्यादा आहेत. कोरोनाला घाबरून क्लीनर, ड्रायव्हर, माल चढवणारे- उतरवणारे लोक कामावर येण्यास अजूनही तयार नाहीत. 

सध्या ८० टक्के उद्योग सुरू झाले आहेत. उत्पादित मालाला पाहिजे तसा उठाव नाही. ट्रान्स्पोर्टिंगची समस्या अजून सुटलेली नाही. देशभरातील विविध मोठ्या शहरांमध्ये कच्चा माल उपलब्ध आहे; पण पुणे आणि मुंबईमध्येच ट्रेडर असून, ही दोन्ही शहरे रेड झोनमध्ये असल्यामुळे पाहिजे तशी ट्रान्स्पोर्टिंग सुरू झालेली नाही. जर आगामी काळात कोरोनामुळे परिस्थिती बिघडली नाही, तर पूर्ण ताकदीने उद्योग सुरू होण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागेल. -मुकुंद कुलकर्णी, मराठवाडा अध्यक्ष, सीआयआय 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकbusinessव्यवसाय