शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

मोटारसायकल चोरांचा धुमाकूळ

By admin | Updated: May 18, 2016 00:15 IST

औरंगाबाद : मोटारसायकल चोरांची टोळी शहरात पुन्हा सक्रिय झाली आहे. गेल्या तीन दिवसांत शहराच्या विविध भागांतून या टोळीने डझनावर मोटारसायकल पळविल्या.

औरंगाबाद : मोटारसायकल चोरांची टोळी शहरात पुन्हा सक्रिय झाली आहे. गेल्या तीन दिवसांत शहराच्या विविध भागांतून या टोळीने डझनावर मोटारसायकल पळविल्या. बळीराम सावंत (रा. भावसिंगपुरा) यांची घरासमोर उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने सोमवारी मध्यरात्री पळविली. अयाज खान (रा. एबीएच कॉलनी, एन-१२) यांनी आपली मोटारसायकल (एमएच १०, एआर ५५४०) एका धार्मिक स्थळासमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्याने रविवारी ती लांबविली. ज्ञानेश्वर दौड (रा. एन-९, हडको) यांची मोटारसायकल (एमएच २०, सीएन ४७८४) सनी सेंटर भागातील एका दुकानासमोरून शनिवारी लांबविण्यात आली. संजय पांडे (रा. उस्मानपुरा) यांची मोटारसायकल गुलमंडीतून लांबविण्यात आली. दत्तात्रय गवळी यांच्या दोन दुचाकी (एमएच २०, डीझेड १९१४ आणि एमएच १७, एडब्ल्यू १००५) वडगाव कोल्हाटी येथील अपार्टमेंटच्या पार्किंगमधून सोमवारी रात्री पळविल्या.ताहेर खान (रा. पीरबाजार) हे आपल्या आजारी नातेवाईकास भेटण्यासाठी बन्सीलालनगरातील एका रुग्णालयात गेले होते. रुग्णालयाच्या पार्किंगमधील त्यांची दुचाकी (एमएच २०, बीके ९७३०) शनिवारी रात्री पळविण्यात आली. संकेत पवार, अक्षय साळी या विद्यार्थ्यांच्या दुचाकी (एमएच २०, डीपी ५०३७ आणि एमएच २०, डीपी ०२०५) एन-९, हडकोतून शनिवारी रात्री लंपास करण्यात आल्या. शेख मोहसीन यांची दुचाकी (एमएच २०, सीएल ८९८२) अज्ञात चोरट्याने बीड बायपासवरील एका लॉन्स समोरून पळविली. अन्य एका घटनेत साईनाथ डहाळे (रा. शिवाजीनगर) यांची दुचाकी (एमएच २०, डीजे ८४७५) हँडल लॉक तोडून रविवारी रात्री लांबविण्यात आली.