शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

माता न तू वैरिणी ! प्रसूतीनंतर शिशूला सोडून मातेचे पलायन; परिचारिकांनी दिली मायेची उब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 18:31 IST

घाटी रुग्णालयातील प्रसूती विभागात ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९.१४ वाजता एक महिला प्रसूतीसाठी दाखल झाली. तेव्हा तिच्यासोबत कोणीही नव्हते.

ठळक मुद्देजन्मानंतर आईच्या मायेला मुकले शिशू प्रसूतीनंतर ही महिला दुपारी येथून गायब झाली.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात प्रसूतीनंतर अवघ्या काही तासांतच नवजात शिशूला सोडून मातेने पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जन्मानंतर शिशू आईच्या मायेला मुकले असले तरी घाटी रुग्णालयातील परिचारिकांनी माता बनून त्या बाळाला मायेची ऊब दिली आहे. (  Mother's escape after delivery; The nurse warmed baby) 

घाटी रुग्णालयातील प्रसूती विभागात ३० ऑगस्ट रोजी सकाळी ९.१४ वाजता एक महिला प्रसूतीसाठी दाखल झाली. तेव्हा तिच्यासोबत कोणीही नव्हते. दाखल झाल्याच्या अवघ्या काही मिनिटांत म्हणजे सकाळी ९.४० वाजता तिची प्रसूती झाली. तिने मुलाला जन्म दिला. महिला आणि तिचे शिशू प्रसूतिगृहातच (लेबर रूम) होते. प्रसूतीनंतर ही महिला दुपारी येथून गायब झाली. हा प्रकार लक्षात येताच सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र, ती मिळून आली नाही. प्रसूतिशास्त्र विभागाने हा प्रकार वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाला कळविला. निवासी वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रवीण सुखदेवे यांनी याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विशाल बोडखे पुढील तपास करीत आहेत. सध्या घाटीतील परिचारिका, केअरटेकर बाळाचा सांभाळ करीत आहेत.

रक्ताची नाती दुरावली ! नातेवाइकांचा सांभाळण्यास नकार, रुग्ण म्हणतो, ‘मला आश्रमात सोडा...’

बाळ ‘एनआयसीयू’मध्ये दाखललेबर रूममध्ये शिशूला सोडून मातेने पलायन केले. या शिशूला जुन्या ‘एनआयसीयू’त दाखल करण्यात आले आहे. या शिशूची काळजी परिचारिका घेत आहेत. पोलीस सदर महिलेचा शोध घेत आहेत. मातेचा शोध लागला नाही, तर सोशल वर्कर्सच्या माध्यमातून बाळ संबंधित संस्थेला हस्तांतरित केले जाईल.- श्रीनिवास गडप्पा, प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीdoctorडॉक्टर