शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

माता न तू वैरीणी ! पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची आईनेच दिली सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 15:58 IST

Rape On Minor Girl In front Of Mother : याप्रकरणी पोस्कोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आईसह आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

औरंगाबाद: पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची खुली सुट देऊन हा बीभत्सपणा उघड्या डोळ्याने पाहणारी आई आणि परितक्त्या आईशी अनैतिक संबंध ठेवताना मुलीवरही आघात करणारा आरोपी अशा दोघांना पुंडलिकनगर पोलिसांनी बुधवारी अटक केली (The mother gave a permission to rape on her minor girl) . पुंडलिकनगर पोलिसांनी सांगितले की, सोहम गाडे (गाडेकर) ( ४५, रा. पुंडलिकनगर) व त्याच्यासोबत अनैतिक संबंध असलेली महिला (३६) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या महिलेच्या अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

पतीशी पटत नसल्याने सदर विवाहिता अल्पवयीन मुलगी व मुलासह गारखेडा परिसरात भाड्याच्या खोलीत राहते. १७ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अंदाजे सहा वर्षांपासून सोहम गाडे आईला भेटण्यास नेहमी घरी येतो. अनेकदा रात्रीच्या वेळीदेखील तो आमच्या घरीच थांबतो. ऑगस्ट २०२० मध्ये आईने माझ्या भावाला मामाकडे पाठवून दिले. त्यादिवशी रात्रीच्या वेळी सोहम गाडे हा आमच्या घरी आला. त्याचे व आईचे काही तरी बोलणे झाले. त्यानंतर सोहम गाडे माझ्याजवळ आला व बळजबरी करू लागला. मी आईकडे तक्रार केली तेव्हा आईनेच त्याला संमती दिली. माझा विरोध कमी पडला व त्याने माझ्यासोबत जबरदस्ती केली. तेव्हा आईही तेथेच होती. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा दोनदा त्याने असेच केले. आई व सोहम यांच्या त्रासाला वैतागून मी घरातून निघून गेले; पण आसरा न मिळाल्याने पुन्हा घरी आले.

जीवे मारण्याची धमकीयाबाबत कोणालाही काही सांगितले, तर मारुन टाकण्याची धमकी आई व सोहम गाडे यांनी दिल्याचे मुलीने तक्रारीत म्हटले आहे. मामाच्या घरी पाठवून लग्न लावून देण्याची हालचाल पाहून मुलीने चाईल्ड हेल्पलाइनला संपर्क केला व त्यानंतर चक्रे हालली. पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फौजदार रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवा गायकवाड यांनी दोघांना ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक मीरा चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद