शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

माता न तू वैरिणी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:23 IST

आईला अटक : घाटनांद्रा येथील बालकाच्या खून प्रकरणाला कलाटणी

सिल्लोड : तालुक्यातील घाटनांद्रा येथील १० महिन्यांच्या बालकाच्या खून प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली असून, बाप व काकाने नव्हे तर जन्मदात्या आईकडूनच पोटच्या गोळ्याचा जीव गेल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.पती-पत्नीमध्ये कौटुंबिक कारणावरून भांडण झाल्याने रागाच्या भरात १ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घरात सासरची सर्व मंडळी झोपलेली असताना कविता मोरे ही घरातून बाळाला घेऊन निघून गेली. बाळ रडत होते. त्याच्या रडण्याचा आवाज कोणाला येऊ नये, यासाठी तिने त्याला छातीशी घट्ट धरले. त्यात बाळाचे नाक व तोंड दबल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाला. स्वत:चा गुन्हा लपविण्यासाठी तिने पती व दिरावर खुनाचा आरोप लावला होता. यामुळे सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात मयत बालक सागरचे वडील संदीप मोरे व काका किशोर मोरे यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खोटी माहिती कविताने पोलिसांना दिली खरी पण, शेवटी खुनाला वाचा फुटली आणि चाणाक्ष पोलिसांनी उलगडा केला. पोलिसांनी कविताला अटक करून सिल्लोड न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तिची हर्सूल कारागृहात रवानगी केली.कवितावर पोलिसांना आधीच होता संशयफिर्यादी अशोक आमटे, कविताने पती व दिराविरुद्ध दिलेली तक्रार, कविताचा जबाब, घटनास्थळाची परिस्थिती, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला शवविच्छेदन अहवाल, यावरून पोलिसांचा कवितावर संशय बळावला होता. पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने हा गुन्हा कबूल केला.चुकले, मला माफ करामाझ्या पोटच्या मुलाचा नकळत माझ्या हातून खून झाला. आता आपण फसू, यातून वाचायचे असेल तर खुनाचा आरोप दुसºयांवर ढकलू, असे मला सुचले.कोणाच्या लक्षात येऊ नये यासाठी सागरचा मृतदेह हा एका ओढ्यातील वाळूमध्ये पुरून टाकला. स्वत:चा गुन्हा लपविण्यासाठी आरोप पती व दिरावर लावले, असे म्हणून तिने टाहो फोडला. मी चुकले, मला माफ करा. त्याचा खून करण्याचा इरादा नव्हता. केवळ रडणे बंद करायचे होते. त्याचे रडणे कायमचे बंद होईल असे वाटले नव्हते; पण चुकीने तो मरण पावला, असे कविताने सांगितले.१२ तास बसली झाडात लपूनदिवस उजाडल्याने कविताचा शोध घेण्यासाठी तिचे नातेवाईक व गावातील लोक येत असल्याचे पाहून कविता ओढ्याच्या काठावर असलेल्या करंजी व बेलाच्या झाडात सकाळी सहा ते संध्याकाळी अंधार पडेपर्यंत तब्बल बारा तास लपून बसली होती व अंधार पडल्यानंतर त्या ठिकाणावरून तिने पलायन केले.सातच दिवसांत लावला पोलिसांनी तपाससात दिवसांत पोलिसांनी घटनेचा तपास करून सत्य समोर आणले. ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिराजदार, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, उपनिरीक्षक संदीप सावळे, सरिता गाढे, हवालदार विष्णू पल्हाड, विलास सोनवणे, विठ्ठल डोके, दादाराव पवार यांनी केली.फोटो... आरोपी कविता मोरे.

टॅग्स :Policeपोलिस