शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सासू-सुनेनं परिश्रमातून उभा केला रोजगार; वाळवण पदार्थातून कुटुंबाला मोठा आधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 15:59 IST

पाककला व्यावसायिक स्तरावर विकसित करून या सासू-सुनेनी कुटुंबाला मोठा आधार दिला आहे.

वाळूज महानगर : उन्हाळ्यात काही लोकांना फिरायला जाण्याची घाई असते. तर काहींना गावी जाऊन आमरसावर ताव मारण्याची. पण, गृहिणींना काळजी असते, ती वर्षभराच्या साठवणीच्या वाळवणाची. आता उन्हाळा सुरू झाल्याने अनेक गृहिणी वाळवणाच्या कामाला लागल्या आहेत. वर्षभराच्या शेवया, कुरडई, पापडाची बेगमी केली जात आहे.

तांदूळ, गव्हाच्या कुरडईची मोठी मागणी असते. गव्हाची कुरडई आपला पारंपरिक पदार्थ आहे. सुनबाई आणि सासूबाई यांनी मिळून परिश्रमाने यातून उद्योग सुरू केला. पाहता पाहता बजाजनगर, वाळूज महानगर सिडको परिसरातील महिलांनी घरगुती बनविलेल्या कुरडई, पापडच्या ऑर्डर देऊन कामगाराच्या कुटुंबाला एक मोठा आधार दिला आहे.

पोट भरण्यासाठी लासूर परिसरातून वाळूज औद्योगिक क्षेत्रात पतीसह आलेल्या दीपिका सचिन मुसळे यांनी त्यांच्या सासूसोबत कुरडई, पापड तयार करण्याची पाककला व्यावसायिक स्तरावर विकसित केली. वाळूज महानगरातील महिलांच्या पसंतीला ही वाळवणाची उत्पादने उतरल्याने त्यांचा व्यवसायात जम बसला. दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या गृहउद्योगाला आज चांगली मागणी आहे. कारण कारखान्यात रोजगाराला जाण्यासाठी आठ तासाचा कालावधी जातो. आपल्याला अवगत असलेल्या पाककलेला विकसित करून या सासू-सुनेनी कुटुंबाला मोठा आधार दिला आहे. 

संपूर्ण कुटुंबाचा कामात हातभारआता वाळूज महानगरात औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक, कामगार कुटुंबीयाकडून वाळवणाचे साहित्य बनवून घेण्यासाठी मदत करत आहेत. या कुटुंबाने बनवलेल्या वाळवणाची चव चांगली असल्याने अनेक गृहिणी पापड, कुरडई घेऊन जातात. आता तर संपूर्ण कुटुंबच या कामात हातभार लावत आहे. आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नाही की मशीन विकत घेऊन रोजगार वाढवावा. परंतु, कोणत्याही बँकेने अजून कर्ज दिलेले नाही. त्यासाठी धडपड सुरू असल्याचे दीपिका मुसळे यांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfoodअन्न