शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आई-बछड्यांची प्रकृती ठणठणीत; ‘समृद्धी’च्या बछड्यांची तज्ज्ञांकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 19:53 IST

Samrudhi Tiger, Aurangabad Municipal Corporation परभणी येथील कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्सचे सहायक प्राध्यापक डॉ. तौहीद अहेमद शफी यांनी रविवारी प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन बछड्यांची पाहणी केली.

ठळक मुद्देकेअरटेकरशिवाय कोणालाही प्रवेश नाहीबछड्यांवर सहा आठवड्यांपर्यंत विशेष लक्ष देणे गरजेचे

औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात ‘समृध्दी’ या वाघिणीने २५ डिसेंबर रोजी पहाटे जन्म दिलेल्या पाच बछड्यांची आणि त्यांच्या आईच्या प्रकृतीची पाहणी रविवारी परभणी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी केली.

चार वर्षांपूर्वी प्राणिसंग्रहालयातील बछडे मरण पावल्यामुळे देशभरात महापालिकेची नाचक्की झाली होती. त्यामुळे महापालिका प्रशासन समृद्धीच्या बछड्यांच्या बाबतीत कोणतीही रिस्क घेण्यास तयार नाही. प्राणिसंग्रहालयातील स्वच्छता, बछड्यांच्या घेतल्या जाणाऱ्या काळजीबद्दल तज्ज्ञांनी समाधान व्यक्त केले. बछड्यांची सहा आठवड्यांपर्यंत काळजी घ्या, दक्ष राहा. केअर टेकरशिवाय कुणालाही पिंजऱ्याच्या जवळ जाऊ देऊ नका, अशा सूचना यावेळी करण्यात आल्या.

परभणी येथील कॉलेज ऑफ व्हेटरनरी सायन्सचे सहायक प्राध्यापक डॉ. तौहीद अहेमद शफी यांनी रविवारी प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन बछड्यांची पाहणी केली. महापालिकेच्या प्राणिसंग्रहालय सल्लागार समितीचे ते सदस्यदेखील आहेत. प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी त्यांना आवश्यक ती माहिती दिली.

आई-बछड्यांची प्रकृती ठणठणीतबछड्यांची आणि त्यांच्या आईची प्रकृती ठणठणीत आहे, त्यांचे वर्तन सर्वसाधारण (नॉर्मल) स्वरूपाचे आहे. बछड्यांना आईचे दूध मुबलक प्रमाणात मिळत आहे, त्यामुळे त्यांची प्रकृती समाधानकार आहे. बछड्यांवर सहा आठवड्यांपर्यंत विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. बछड्यांसाठी पहिले सहा आठवडे काळजीचे (क्रिटिकल) असतात, त्यामुळे सहा आठवड्यांच्या काळात त्यांची योग्य निगा राखा, केअर टेकरशिवाय अन्य कुणालाही पिंजऱ्याच्या जवळ जाऊ देऊ नका, अशी सूचना आपण प्राणिसंग्रहालय व्यवस्थापनाला केली आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत. बछड्यांना थंडीचा त्रास होऊ नये म्हणून पिंजऱ्यात हिटर लावले आहेत, असे डॉ. शफी यांनी सांगितले. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादTigerवाघ