शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात तिसऱ्या लाटेत लाखावर कोरोना रुग्ण ? सहा उपायुक्तांची विशेष कोअर टीम गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 14:04 IST

corona virus in Marathwada : विभागात तिसऱ्या लाटेत दीडपट रुग्ण संख्या आढळल्यास आरोग्य सुविधांचे सर्वोच्च पातळीवर नियोजन असावे. या दिशेने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देखाटा आणि ऑक्सिजन पुरवठ्यावरच मुख्य लक्ष

औरंगाबाद: मराठवाड्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव झाल्यास दुसऱ्या लाटेच्या दीडपट रुग्णसंख्या असेल, हे गृहीत धरून नियोजन करण्यासाठी विभागात सहा उपायुक्तांची विशेष कोअर टीम विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी नुकतीच स्थापन केली.

एप्रिल २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात विभागात एकाच दिवशी ७७ हजार ४४२ कोरोनाचे रुग्ण आढळले होते. त्या दिवसाची रुग्णसंख्या सर्वात जास्त होती. तज्ज्ञांनी आणि शासनाने त्या आकडेवारीचा आधार घेत विभागात तिसऱ्या लाटेत दीडपट रुग्ण संख्या आढळल्यास आरोग्य सुविधांचे सर्वोच्च पातळीवर नियोजन असावे. या दिशेने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

विभागीय आयुक्तांनी सोमवारी (दि.२६) विभागातील सर्व जिल्हाधिकारी, सीईओंची ५ तास बैठक घेतली. त्यानंतर सहा जणांचे पथक गठित केले. महसूल उपायुक्त पराग सोमण, उपायुक्त वीणा सुपेकर, जगदीश मिनीयार, अविनाश पाठक, शिवाजी शिंदे आणि रश्मी खांडेकर यांचा टीममध्ये समावेश आहे. ही टीम विभागातील पूर्ण जिल्ह्यातील आरोग्य सुविधांची तयारी कशी आहे, याचा आढावा घेऊन उणिवा दूर करण्यासाठी काम करणार आहे.

या टीमने दोन दिवसात औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याचा आढावा घेऊन सूचना केल्या आहेत. येत्या काही दिवसांत विभागातील पूर्ण जिल्ह्यात ही टीम जाणार असून तेथील औषधी, आरोग्य सुविधा, नवजात शिशू उपचार व्यवस्था, बालकांसाठी कोविड केअर सेंटरची व्यवस्था, डॉक्टर, नर्सचे प्रशिक्षण, ऑक्सिजन सिलिंडर्स साठा याची माहिती घेणार आहे.प्रशासन तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करीत असलेल्या तयारीची माहिती शासनाकडे पाठविण्यात आली आहे. नवजात शिशू, बालकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांना कसे हाताळावे, याचे प्रशिक्षणही विभागात पार पडले. बालरोग तज्ज्ञ उपलब्धतेची माहिती तयार आहे. नर्सेसना देखील प्रशिक्षण दिले आहे, असे प्रशासनाने सांगितले.

खाटा आणि ऑक्सिजन पुरवठ्यावरच मुख्य लक्षप्राधान्याने बेडची उपलब्धता आणि ऑक्सिजन पुरवठा यावरच विशेष लक्ष देण्यात येणार आहे. ७७ हजार ४४२ अ‍ॅक्टिव्ह केसेस एप्रिल महिन्यात होत्या. तज्ज्ञांच्या मते तिसरी लाट आली तर दीडपट रुग्णवाढ होऊ शकते. म्हणजेच १ लाख रुग्ण आढळल्यास विभागात जिल्हा निहाय इन्फ्रास्ट्रक्चर सक्षम असले पाहिजे. त्यात काय कमतरता आहे. याचा आढावा पथक घेत आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाAurangabadऔरंगाबादDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालयcorona virusकोरोना वायरस बातम्या