शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

सासरच्या छळाने टोक गाठले; गर्भवती महिलेचा पोटात लाथा मारून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 19:13 IST

याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, शवविच्छेदन इनकॅमेरा करण्यात यावे, नसता मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका मृताच्या नातेवाइकांनी घेतली होती.

सिल्लोड : माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून पतीसह सासरच्यांनी गर्भवती महिलेच्या पोटात लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तिचा निर्घृण खून केल्याची संतापजनक घटना शहरातील शास्त्री कॉलनीत गुरुवारी रात्री ९:३० वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांली पतीसह सासऱ्याला अटक केली.

मनीषा सतीश सपकाळ (वय २४, रा. शास्त्री कॉलनी, सिल्लोड) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पती सतीश लक्ष्मण सपकाळ, सासरा लक्ष्मण कडुबा सपकाळ, सासू लिलाबाई सपकाळ यांच्याविरुद्ध शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार मनीषा हिचे लग्न सतीश याच्यासोबत २०१८ मध्ये झालेले आहे. लग्नानंतर काही महिने सासरच्यांनी मनीषाला चांगले नांदविले. मात्र, त्यानंतर तिचा छळ करण्यास सुरुवात केली. लग्नामधील राहिलेला हुंडा घेऊन ये, तुला मूलबाळ नाही, पतीला नोकरीला लावण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून सासरची मंडळी मनीषाचा शारीरिक व मानसिक छळ करत होती. तिला अनेकवेळा घराबाहेर काढून माहेरी देखील हाकलून दिले होते. माहेरच्या लोकांनी सासरच्या मंडळींची समजूत घातल्यानंतर मनीषा पुन्हा सासरी नांदावयास आली. तरी पण तिचा छळ सुरूच होता. दरम्यान, कुठलीच मागणी मनीषाकडून पूर्ण होत नसल्याने सासरच्या लोकांनी तिचा खून करण्याचा कट रचला. मनीषा गर्भवती असल्याचे माहीत असताना, देखील निर्दयी सासरच्यांनी गुरुवारी रात्री ९:३० वाजता तिच्या पोटात लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून तिचा खून केला.

विवाहितेच्या वडिलाला दिली खोटी माहितीया घटनेनंतर सासरच्यांनी मनीषाच्या वडिलाला फोन करून तुमच्या मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची खाेटी माहिती दिली. त्यानंतर मनीषाचे आई-वडील, नातेवाइकांनी सिल्लोडमध्ये धाव घेतली. परंतु, तोपर्यंत सासऱ्यांनी मनीषाला मृत अवस्थेत सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.

आरोपींना अटक करा, नातेवाईक आक्रमकयाप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, शवविच्छेदन इनकॅमेरा करण्यात यावे, नसता मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका मृताच्या नातेवाइकांनी घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी दुपारी मनीषाचे वडील खंडू किसन शेळके (वय ४७, रा. रामपुरवाडी, ता. कन्नड) यांच्या तक्रारीवरून सदर तीन आरोपींविरोधात सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पती आणि सासऱ्यांनी अटक करण्यात आली. शवविच्छेदन केल्यानंतर मनीषाच्या पार्थिवावर रात्री माहेरी अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरpregnant womanगर्भवती महिला