शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

पैसे गेले, खदान गेली, हाती वसुलीची नोेटीस आली..!

By admin | Updated: June 18, 2016 00:56 IST

विशाल सोनटक्के , उस्मानाबाद ट्रॅक्टर आणि मजुरांच्या हाताला काम मिळेल या आशेने खदानीसाठीची निविदा भरली. त्यासाठी चलनाद्वारे ५९ हजार रुपयेही जमा केले.

विशाल सोनटक्के , उस्मानाबादट्रॅक्टर आणि मजुरांच्या हाताला काम मिळेल या आशेने खदानीसाठीची निविदा भरली. त्यासाठी चलनाद्वारे ५९ हजार रुपयेही जमा केले. मात्र खदानीचे काम काही मिळाले नाही. त्यामुळे या कामाचा नाद सोडून दिल्यानंतर तब्बल १२ वर्षानी प्रशासनाने सदर व्यक्तीला १ लाख ३२ हजार रुपयांच्या वसुलीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे ‘तेल गेले तूप गेले, हाती धुपाटणे आले’ अशी अवस्था या निविदाधारकाची झाली आहे.२००२-०३ यावर्षी वाशी तालुक्यातील मांडवा येथील दगड खानीचा लिलाव निघाला होता. कळंब तालुक्यातील ईटकूर येथील परशुराम मारुती जाधव यांनी या लिलावात सहभाग घेतला. त्यासाठी ५९ हजार रुपयांची रक्कमही चलनाद्वारे भरली. त्यानंतर खदान कामासाठी ताब्यात देण्याची विनंती त्यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांना केली. मात्र खदानीचा ताबा काही मिळाला नाही. यासाठी काही दिवस त्यांनी तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारल्या. त्यावेळी अन्य दुसऱ्याच व्यक्तीला सदर खदानीचे काम दिल्याचे समजले. त्यामुळे भरलेली रक्कम परत देण्याची मागणी त्यांनी केली. मात्र वारंवार पाठपुरावा करुनही त्यांना सदर रक्कम मिळाली नाही. याबाबत त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दाद मागितली असता, खदानीसाठीची संपूर्ण म्हणजे १ लाख ७६ हजाराची रक्कम भरा, अन्यथा तुमची हरास रद्द करण्यात येईल, असे सांगण्यात आले. यावर जाधव यांनी हरास रद्द केल्याबाबतचे पत्र मागितले. मात्र वारंवार पाठपुरावा करुनही त्यांना भरलेली रक्कम आणि हरास रद्द केल्याबाबतचे पत्र मिळाले नाही. दोन-चार वर्ष पाठपुरावा केल्यानंतर भरलेली रक्कम अक्कलखाती जमा करीत त्यांनी खदानीसोबतच भरलेल्या रक्कमेचाही नाद सोडून दिला. मात्र जानेवारी २०१६ मध्ये म्हणजे तब्बल १२ वर्षानंतर प्रशासनाने त्यांना आणखी एक धक्का दिला. खदानीपोटीचे एक लाख ३२ हजार तातडीने जमा करण्याची नोटीस त्यांना बजावण्यात आली. या नोटीसीने परशुराम जाधव गांगरुन गेले. त्यानंतर त्यांनी पुन्हा तहसील, उपविभागीय कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चकरा मारण्यास सुरुवात केली. मात्र कुठेही त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. ५९ हजार रुपये चलनाद्वारे बँकेत भरल्याच्या पावत्या त्यांच्याकडे आहेत. मात्र त्यानंतर ती रक्कम पुढे कुठे वर्ग झाली याची कसलीही माहिती शासन दरबारी नाही. जाधव यांनी माहितीचा अधिकार कायद्याद्वारे ही माहिती मागविली. मात्र त्यांना कसलेही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. खदानच्या लिलावापोटी भरलेली ५९ हजाराची रक्कम कुठे वर्ग झाली. या तसेच इतर माहितीसाठी परशुराम जाधव आता विविध कार्यालयास खेटे घालत आहेत. याअनुषंगानेच त्यांनी सदर लिलावाच्या नकलांची मागणी तहसील कार्यालयाकडे केली असता, २००२-०३ च्या संचिकांचा शोध घेण्यासाठी पथक नेमण्यात आल्याचे पत्र त्यांना तहसील कार्यालयाने दिले असून, संचिका मिळताच आपणाला नक्कल दिली जाईल, असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.निविदा भरुनही खदान दिली नाही. तसेच निविदेसाठी भरलेली ५९ हजार रुपयांची रक्कमही परत मिळालेली नसताना प्रशासनाने एक लाख ३२ हजार येणे असल्याची नोटीस बजावली आहे. याबाबतची माहिती मागविली असता तहसील कार्यालय रेकॉर्ड सापडत नसल्याचे सांगते. या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून तहसील उपविभागीय कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारत आहे. मात्र उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. आजतर तहसील कार्यालयाने मी वारंवार विचारणा करण्यासाठी कार्यालयात चकरा मारतो, माजी वर्तणूक योग्य नाही असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले असल्याचे परशुराम जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.