शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

निराधार योजनांतील बोगस लाभार्थी शोधमोहिमेला लागेना मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 19:13 IST

जिल्ह्यातील बहुतांश गरजूऐवजी सधन नागरिकच योजनेचे लाभार्थी असल्याचे आरोप सुरू होताच, तहसील पातळीवर सर्व लाभार्थ्यांची पाहणी केली

ठळक मुद्देबायोमेट्रिक, आधारलिंक सक्तीचे  हायटेक सिस्टिममुळे पारदर्शकता येत असल्याचा दावा

- विकास राऊत

औरंगाबाद : बायोमेट्रिक आणि ऑनलाईन आधारलिंक करण्याच्या प्रक्रियेमुळे बोगस लाभार्थ्यांना चाप बसल्याचा दावा करण्यात येत असला तरी लाभार्थी खरे की खोटे याचा आढावा तहसील पातळीवर तलाठ्यांमार्फत घेण्यास अद्याप मुहूर्त लागला नसल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यातील बहुतांश गरजूऐवजी सधन नागरिकच योजनेचे लाभार्थी असल्याचे आरोप सुरू होताच, तहसील पातळीवर सर्व लाभार्थ्यांची पाहणी केली जाते, परंतु मागील काही दिवसांपासून पाहणीच केली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. निराधार योजना समितीचे माजी अध्यक्ष विकास कुलकर्णी यांनी सांगितले, बायोमेट्रिक अनुदान वाटप, आधारलिंक सक्तीचे केलेले असले तरी बोगस लाभार्थी असल्याचे माझ्या काळात समोर आले होते. गरजूंपर्यंत या योजनांना लाभ पोहोचत नाही. जे नागरिक सधन आहेत, त्यांना योजनेचा लाभ मिळतो आहे. ज्यांच्या हातांचे ठसे बायोमेट्रिकवर उमटत नाहीत, त्यांचे आधारकार्ड बँकेत जमा आहेत. हयात प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया नियमित असते. बाकी लाभार्थ्यांची पाहणी नियमित होत नाही, असा आरोप त्यांनी केला.

बोगसचा मुद्दा सध्या तरी नाही, परंतु मयत असतील तर ते लाभार्थी कमी केले जातात. काही योजना टाईमबॉण्ड असतात. ज्या लाभार्थ्यांचे उत्पन्न वाढलेले असेल किंवा त्यांचे पाल्य २५ वर्षांचे झालेले असतील, त्यांचे अनुदान कमी केले जाते. संजय गांधी निराधार योजनेमध्ये तीन प्रकार आहेत. एस.सी, एस.टी आणि सर्वसाधारण, इंदिरा गांधी योजनेच्या तीन उपाययोजना झाल्या आहेत. जिल्ह्यात आधारलिंक केलेले आहे. सुरुवातीला बोगस लाभार्थी असायचे. परंतु ऑनलाईन लिंक असून बायोमेट्रिकद्वारे अनुदान वाटप केले जाते. त्यामुळे बोगस लाभार्थ्यांचे प्रमाण नसल्यात जमा आहे. हायटेक सिस्टिममुळे पारदर्शकता येत असल्याचा दावा तहसीलदार अनिता भालेराव यांनी केला.

कोणत्या योजनेचे किती आहेत लाभार्थीसंजय गांधी योजना- ३३६४२श्रावणबाळ योजना- ५९०३०इंदिरा गांधी योजना- ३८८७९एकूण - १ लाख ३१ हजार ५५१

इतर योजनेचे लाभार्थीइंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना - ७१४इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना - ३९२राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना - १६२एकूण- १२६८

याबाबत घेतली जाते माहितीसंजय गांधी निराधार योजनेंतर्गत अनाथ, दिव्यांग, परितक्त्या, घटस्फोटित, विधवांसाठी अनुदान दिले जाते. यातील लाभार्थी योग्य आहेत की नाही. त्यांचे हयात प्रमाणपत्र, लाभार्थी मयत झाले आहेत काय, आधार लिंक असताना काही लाभार्थ्यांच्या हातांचे ठसे बायोमेट्रिक यंत्रणेवर उमटत नाहीत. त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी तालुकानिहाय तहसील पातळीवर तपासणी केली जाते. यात जर काही माहिती चुकीची आढळली तर सदरील लाभार्थ्याचे अनुदान बंद केले जाते.

निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची माहिती अशीनिवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी सांगितले, बोगस किंवा मयत झालेल्या लाभार्थ्यांचा शोध ही नियमित मोहीम असते. जवळपास सर्व काही ऑनलाईन आणि बायोमेट्रिक झाल्यामुळे या सर्व योजनांमध्ये पारदर्शकता आली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबादfraudधोकेबाजी