शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

आई मला शाळेत जायचंय...; जिल्ह्यात पाचवी ते आठवीचे वर्ग झाले सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 13:58 IST

Classes V to VIII started in the Aurangabad district विद्यार्थी वर्गात येण्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र देखील अनिवार्य करण्यात आले आहे.

ठळक मुद्देआॅनलाईनपेक्षा वर्गात शिकण्याची इच्छा आहेएका मोबाईलवर दोन भावंडांना अडजेस्ट होत नाहीचार विषयांव्यतीरितक्त इतर विषयांची तयारी होईल

औरंगाबाद : विद्यार्थ्यांना खेळायला मोबाईल तर हवाय. पण त्यावरच्या त्या दररोजच्या लिंक, व्हाट्सॲप ग्रुममध्ये पाठवावा लागणारा गृहपाठ. त्या रोजच्या मॅसेज, गुगल मीटचा कंटाळा आला आहे. त्यामुळे सर्वंच विद्यार्थ्यांत शाळेत जाण्याची उत्सुकता दिसून येत असुन, पालकांत मात्र, काहीशी भीती असल्याने संमतीपत्राला द्विधा मनस्थिती असल्याने विद्यार्थ्यांत आई मला शाळेला जायचंय असा हट्ट करण्याची वेळ आली आहे.दरम्यान, जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाचवी ते आठवी तर शहरात सहावी ते आठवीचे वर्ग बुधवारपासून उत्साहात सुरु झाले आहेत. 

शहरी भागातील ४४१ शाळांत ६ वी ते ८ वीचे वर्ग सुरु झाले. शिक्षकांच्या तपासण्या, निर्जंतुकीकरणा संदर्भात प्रक्रिया पूर्ण झाली आहे, असे मनपा शिक्षणाधिकारी रामनाथ थोरे म्हणाले. ग्रामीणमध्ये १ हजार ७७७ शाळेत पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करत आहोत. त्यात २ लाख ७५ हजार १०५ विद्यार्थी शिकतात. २७ जानेवारीपासून त्यांचे नियमित वर्ग सुरु होतील. त्यापूर्वी आरटीपीसीआर टेस्ट, कोरोना संदर्भात घ्यावयाची सर्व सूचना शाळांना दिल्या आहेत. विद्यार्थी वर्गात येण्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र देखील अनिवार्य करण्यात आले आहे. सर्व मुख्याध्यापकांकडून शाळेची तयारी आणि शिक्षकांच्या तपासणची माहीती आॅनलाईन संकलीत करत आहोत. असे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी सांगितले. जिल्ह्यातील २२१८ शाळांत ३ लाख ३८ हजार ७५३ विद्यार्थी पाचवी ते आठवी वर्गात शिकतात. त्यासाठी ७ हजार ६२३ शिक्षक आहेत. या शिक्षकांना आरटीपीसीआर कोरोना तपासणी २५ जानेवारीपर्यंत अनिवार्य करण्यात आली होती. बहुतांश शिक्षकांच्या तपासण्या झाल्या असुन शाळांनीही वर्ग सुरु करण्याची तयारी पुर्ण केली आहे. जिल्ह्यात पाचवी ते आठवी वर्ग सुरु होताना केवळ शहरात पाचवीचे वर्ग सुरु होणार नाही, असे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.

विद्यार्थी काय देताहेत कारणे-खुप दिवसांपासून घरी असल्याने खुप कंटाळलो आहोत.-आॅनलाईनपेक्षा वर्गात शिकण्याची इच्छा आहे- आॅनलाईनमधुन शिकलेले फारसे कळत नाही- एका मोबाईलवर दोन भावंडांना अडजेस्ट होत नाही- खूप दिवस झाले मित्रांना भेटलो नाही शाळेत भेट होईल-शाळा सोडून सर्व सुरु आहे मग वर्गात जायला काय हरकत-चार विषयांव्यतीरितक्त इतर विषयांची तयारी होईल-इतिहास भुगोल नागरिकशास्त्र हेही महत्वाचे विषय कसे कळणार

शाळेत मजा येईलघरी राहून राहून कंटाळा आलाय. ऑनलाईन ग्रुप मध्ये आलेल्या लिंक आणि व्हीडीओ पाहून जमेल ते शिकलो. शाळेत आता शिक्षक प्रत्यक्ष शिकवणार त्यातून काहीतरी डोक्यात उतरेल. मित्रही खूप दिवसांनी भेटतील. शाळेत मजा येईल.- ज्ञानेश्वर भिसे, आठवीचा विद्यार्थी, भोईवाडा

कधी शाळा सुरु होतेय आणि शाळेत जातेय असे झाले होते. आजच संमंतीपत्र भरुन दिले शाळेत. बुधवारी सर्व मैत्रीणी एकत्र वर्गात भेटतील. गणित विज्ञान आॅनलाईनमध्ये कळत नव्हते. तेही सरांकडून प्रत्यक्ष समजून घेता येईल.- वैष्णवी कोलते, सातवीची विद्यार्थीनी, भालगांव

आजुबाजुला सर्व सुरुच झाले आहे. मग शाळेत जायला काय अडचण. आई कोरोनामुळे नाही म्हणते. पण, काळजी घेतल्यावर काही होणार नाही. मी आईना तयार करेल संमतीपत्र द्यायला. घरी किती दिवस राहायचे आता. कंटाळा आलाय घरी राहून.- मयुर थोरात, सहावी विद्यार्थी, पदमपुरा,

शाळेत जाण्याची इच्छा आहे. सगळीकडे पाचवीचा वर्ग सुरु होतोय. पण आपल्या शहरात नाही. त्यामुळे शाळेतून अद्याप काहीही निरोप आला नाही. त्यामुळे ऑनलाईन वर्ग सुरु राहील बहुतेक. ऑनलाईन कळत नाही म्हणून शिकवणीतून विषय समजुन घेतोय.- धानिया मिठावाला, पाचवी विद्यार्थीनी, चौहारा

जिल्ह्यातील पाचवी ते आठवी विद्यार्थी संख्यापाचवी - ८७,८६९सहावी - ८६, २०७सातवी- ८५, ०४४आठवी- ७९,६३३

टॅग्स :SchoolशाळाAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या