शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
4
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
5
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
6
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
7
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
8
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
9
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
10
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
11
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
12
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
13
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
14
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
15
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
16
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
17
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
18
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
19
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
20
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं

इंजेक्शन देण्याच्या बहाण्याने महिलेसोबत छेडछाड; डॉक्टरला जमावाने बदडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 14:10 IST

Crime News in Aurangabad : महिलेची तपासणी करून औषधीची चिठ्ठी लिहून देत तिच्या सासूला मेडिकलमध्ये औषधी आणण्यासाठी पाठवून दिले.

ठळक मुद्देआरोपी डॉक्टरविरुध्द गुन्हा दाखल

वाळूज महानगर : खासगी रुग्णालयात उपचारासाठी गेलेल्या रुग्ण महिलेची छेड काढणाऱ्या डॉक्टरला जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी जोगेश्वरीत घडली. या छेडछाड प्रकरणी आरोपी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Molestation of a woman patient under the pretext of giving injections; The doctor was beaten by the crowd) 

वाळूज एमआयडीसी परिसरातील एक १९ वर्षीय विवाहिता कान दुखत असल्याने सासूला सोबत घेऊन गुरुवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास जोगेश्वरीतील डॉ. नागेश शेजवळ याच्या रुग्णालयात गेली. दवाखान्यात गेल्यानंतर डॉ. नागेश याने त्या महिलेची तपासणी करून औषधीची चिठ्ठी लिहून देत तिच्या सासूला मेडिकलमध्ये औषधी आणण्यासाठी पाठवून दिले. त्या महिलेची सासू मेडिकलमध्ये गेल्यानंतर डॉ. नागेश याने तिला इंजेक्शन देण्याचा बहाणा करून तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेली महिला घरी निघून गेली. या छेडछाडीमुळे धक्का बसलेल्या महिलेने या घटनेची वाच्यता कुठेही केली नाही.

हेही वाचा - बाल भिकाऱ्यांचे पालक शोधणार; बालकल्याण समिती राबविणार 'मुस्कान' अभियान

छेडछाड करणाऱ्या डॉक्टरला बदडलेशुक्रवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास पीडित महिलेचा पती घरी आल्यानंतर त्याने पत्नीला तू काल दवाखान्यात गेली होती का, अशी विचारणा केली. तेव्हा तिने दवाखान्यात घडलेल्या प्रकाराची माहिती पतीला सांगितली. डॉक्टरने पत्नीची छेड काढल्याचे समजताच तिच्या पतीने नातेवाईक व गावातील नागरिकांना या प्रकाराची माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नातेवाईक व गावातील काही जण दवाखान्यात डॉ. नागेश यास जाब विचारण्यासाठी गेले. मात्र या प्रकाराची कुणकुण लागताच त्याने दवाखान्यातून पळ काढला. यानंतर जमावाने डॉ. नागेश याचा पाठलाग करून वाळूज एमआयडीसीतील सुदर्शन कंपनीजवळ त्यास पकडून चोप देत या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून डॉ. नागेश यास ताब्यात घेतले. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून छेडछाड करणाऱ्या डॉ. नागेशविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अधाणे हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादWalujवाळूज