लोकमत न्यूज नेटवर्कबीड : आष्टी व अंभोरा परिसरातील सराईत असणाºया भोसले टोळीविरूद्ध ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९) अंतर्गत कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. अंभोरा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षकांनी पोलीस अधीक्षकांमार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे हा प्रस्ताव दिला होता. मंगळवारी याला परवानगी मिळाली. कृष्णा विलास भोसलेसह आटल्या ईश्वर भोसले याचा टोळीत समावेश आहे.कृष्णा विलास भोसले, अजय विलास भोसले (हातोळण ता. आष्टी), आटल्या ईश्वºया भोसले, संदीप्या ईश्वºया भोसले (रा. पिंपरी घुमरा ता.आष्टी), दिलीप उर्फ दिलप्या नेहºया उर्फ पंडित काळे, हैवाण काळे (रा.चिखली ता.आष्टी) अशी भोसलेच्या टोळीतील लोकांची नावे आहेत. कृष्णा हा टोळीचा प्रमुख असून त्याच्याविरूद्ध विविध ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. तसेच आटल्या ईश्वर भोसलेच्या मागावर मागील अनेक दिवसांपासून पोलीस आहेत. परंतु तो पोलिसांना चकवा देत आहे.या टोळीविरूद्ध जबरी चोरी, दरोडा, खून यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत. हे लोक विनाकारण जनतेला वेठीस धरत आहेत. गुन्हेगारीला आळा बसावा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम.डी.टाक यांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे टाक यांनी मोक्काअंतर्गत भोसले टोळीचा प्रस्ताव तयार करून ७ आॅगस्ट २०१७ रोजी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक मिलींद भारंबे यांच्याकडे दाखल केला.भारंबे यांनी २२ आॅगस्ट रोजी मोक्का कायद्याचे कलम वाढवून तपास करण्याचे परवानगी दिली. याचा तपास आष्टीचे पोलीस उपअधीक्षक अभिजित पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.त्यांचा तपास सुरूचगत महिन्यात बीडमधील आठवले टोळीविरूद्धही अधीक्षक जी. श्रीधर यांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली होती. त्यांच्या तपासासाठी पथकेही नियुक्त केली आहेत. परंत अद्यापही तपास घेण्यात यश आलेले नाही. त्यांचा तपास सुरुच असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आष्टीच्या भोसले, काळे टोळीविरुद्ध ‘मोक्का’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:48 IST