लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील महानगरपालिकेतील भाजपाचे गटनेते मोकिंद बळीराम खिल्लारे यांना शिस्तभंगाच्या कारणावरुन पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले असल्याचे आदेश पक्षाचे सरचिटणीस आ. सुरजितसिंह ठाकूर यांनी शुक्रवारी काढले आहेत. परभणी महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर निवड तसेच स्वीकृत सदस्य निवड प्रक्रियेच्या वेळी पक्षादेश डावलून पक्ष शिस्तभंग करणे, पक्षाच्या धोरणाविरुद्ध भूमिका घेऊन पक्षाची जनमाणसांत प्रतिमा मलीन करणे अशा व इतर पक्षविरोधी कृत्याच्या गंभीर तक्रारी व अहवाल पक्षाकडे प्राप्त झाल्याने भारतीय जनता पार्टीतून मोकिंद खिल्लारे यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले असल्याचे या संदर्भातील आदेशात नमूद करण्यात आले आहे.
मोकिंद खिल्लारे सहा वर्षांसाठी भाजपातून निलंबित
By admin | Updated: July 8, 2017 00:06 IST