औरंगाबाद : औरंगाबादचा राष्ट्रीय खेळाडू मोहंमद मोहसीन खान याने कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत पदकांचा डबल धमाका केला. विशेष म्हणजे १४ वर्षे वयही पूर्ण नसताना औरंगाबादचा प्रतिभावान उदयोन्मुख खेळाडू असणाºया मोहंमद मोहसीन खान याने सिनिअर गटात आपला विशेष ठसा उमटवताना सर्वांना चकित केले.मोहंमद मोहसीन याने सिनिअर गटात खेळताना १४.२६ मीटर थाळीफेक करताना सुवर्णपदक जिंकले. त्याचप्रमाणे गोळाफेकमध्येही त्याने रौप्यपदकाची कमाई केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नियमित सराव करणाºया मोहंमद मोहसीन खान याने याआधीही गतवर्षी चिपळूण येथे जानेवारी महिन्यात झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेतही जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने या स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तसेच थाळीफेकमध्ये रौप्य, अशा दोन पदकांची कमाई केली होती. या कामगिरीमुळे त्या वर्षी त्याची जयपूर येथे झालेल्या राष्ट्रीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेतही निवड झाली होती. मोहंमद मोहसीन खान याला त्याचे वडील असिफ पठाण यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या जबरदस्त कामगिरीबद्दल मोहंमद मोहसीन खान याचे राज्य पॅरा अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष कमांडर विनोद नरवडे, विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दयानंद कांबळे, अभय देशमुख, औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, सचिव गोविंद शर्मा आदींनी अभिनंदन केले आहे.
राज्य पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत मोहंमद मोहसीनला गोल्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:52 IST
औरंगाबादचा राष्ट्रीय खेळाडू मोहंमद मोहसीन खान याने कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत पदकांचा डबल धमाका केला. विशेष म्हणजे १४ वर्षे वयही पूर्ण नसताना औरंगाबादचा प्रतिभावान उदयोन्मुख खेळाडू असणाºया मोहंमद मोहसीन खान याने सिनिअर गटात आपला विशेष ठसा उमटवताना सर्वांना चकित केले.
राज्य पॅरा अॅथलेटिक्स स्पर्धेत मोहंमद मोहसीनला गोल्ड
ठळक मुद्देकोल्हापूर येथे स्पर्धा : वयाने लहान असतानाही सिनिअर गटात घेतली झेप