शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये टाऊन हॉल उड्डाणपुलाखालील मोबाईल शॉपी चोरट्यांनी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2018 16:14 IST

शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून टाऊन हॉल उड्डाणपुलाखालील मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी रोख ४० ते ४५ हजार रुपये आणि दुरूस्तीसाठी आलेले जुने मोबाईल चोरून नेले. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. 

औरंगाबाद: शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून टाऊन हॉल उड्डाणपुलाखालील मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी रोख ४० ते ४५ हजार रुपये आणि दुरूस्तीसाठी आलेले जुने मोबाईल चोरून नेले. ही घटना शनिवारी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. 

याविषयी प्राप्त माहिती अशी की, फहेरुद्दीन शेख यांचे टाऊन हॉल उड्डाणपुलाखाली गोल्डन मोबाईल शॉपी नावाचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री १० वाजेच्या सुमारास त्यांनी  नेहमीप्रमाणे दुकान बंद केले आणि ते घरी गेले. नंतर केव्हातरी चोरट्यांनी दुकानाच्या छतावरील पत्रे उचकटून आत प्रवेश केला. दुकानाच्या गल्लयाातील रोख ४० ते ४५ हजार रुपये आणि विविध ग्राहकांचे रिपेरिंंगसाठी आलेले जुने मोबाईल चोरट्यांनी लंपास केले. 

आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास दुकानमालक शेख यांनी दुकान उघडले असता त्यांना दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरट्यांनी दुकान फोडल्याचे लक्षात येताच त्यांनी घटनेची माहिती बेगमपुरा पोलिसांना कळविली. पोलीस निरीक्षक राजश्री आडे, पोलीस उपनिरीक्षक सरवर शेख, कर्मचारी जाधव यांनी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून ठसे तज्ज्ञांनीही घटनास्थळी संशयितांच्या ठश्यांचे नमुने घेतले. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची कारवाई बेगमपुरा ठाण्यात सुरू होती.