शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनात मनसे मैदानात; शहरात स्वप्नपूर्ती रॅलीचे आयोजन

By बापू सोळुंके | Updated: March 14, 2023 15:21 IST

हजारो नागरीक समर्थनपत्रे घेऊन पोहचणार विभागीय आयुक्तालयात

छत्रपती संभाजीनगर: शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर व्हावे, अशी अनेक वर्षापासूनची येथील नागरीकांची मागणी आणि स्वप्न होते.  केंद्र सरकारने औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतल्याने लाखो नागरीकांची स्वप्नपूर्ती झाली आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने १६ मार्च रोजी स्वप्नपूर्ती रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मनसचे संपर्कनेते दिलीप धोत्रे , जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी  पत्रकार परिषदेत दिली. रॅलीत सहभागी होणारे हजारो नागरीक छत्रपती संभाजीनगरचे समर्थनपत्र विभागीय आयुक्तांना देणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

धोत्रे म्हणाले की, नामांतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर काही लोकांनी याविरोधात  आंदोलन सुरू  केले. काेणतेही कारण नसताना खासदार इम्तियाज जलील आणि अन्य काही लोकांनी  छत्रपती संभाजीनगर  नावास विरोध केला जात आहे. या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर व्हावे, असे येथील नागरीकांचे अनेक दशकापासून चे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. या नागरीकांना सोबत घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वप्नपूर्ती रॅली आयोजित केली आहे. १६ मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता राजाबाजार येथील संस्थान गणपती येथून रॅलीला सुरवात होईल.

यानंतर ही रॅली हजारोंच्या संख्येने विभागीय आयुक्तालयात जाईल. रॅलीत सहभागी नागरीक छत्रपती संभाजीनगरचे समर्थनपत्र हातात घेऊन सहभागी होतील. ही सर्व समर्थनपत्र विभागीय आयुक्तांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वप्नपूर्ती रॅलीत जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी व्हावे, आणि समर्थनपत्रे मनसेकडे जमा करावी, असे आवाहन मनसेतर्फे करण्यात आले.  वैभव मिटकर,बीपिन नाईक,गजन गौडा पाटील,अनिकेत निल्ल्लावार,प्रशांत जोशी,संकेत शेटे,नागेश तूसे,अशोक पवार,राहुल पाटील,विक्रम सिंग परदेसी,मनीष जोगदंड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेला मनसेचे सरचटीस संतोष नागरगोजे,अशोक तावरे, सतनामसिंग गुलाटी, दिलीप बनकर पाटील आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :MNSमनसेAurangabadऔरंगाबाद