शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मध्यच्या सर्वांगीण विकासासाठी एम.एम. शेख यांनाच विजयी करा

By admin | Updated: October 8, 2014 01:04 IST

औरंगाबाद : सर्वांगीण विकास करायचा असेल, तर शेख यांच्याशिवाय पर्याय नाही, असा विश्वास राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केला.

औरंगाबाद : एम.एम. शेख हे स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व असून, त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे. औरंगाबाद मध्य विधाानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करायचा असेल, तर शेख यांच्याशिवाय पर्याय नाही, असा विश्वास राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केला. एन-९ एच सेक्टर येथील कॉर्नर सभेत राजेंद्र दर्डा यांनी एम.एम. शेख यांना विजयी करण्याचे आवाहन केले. काँग्रेसचे मध्यचे उमेदवार एम.एम. शेख यांच्या प्रचारार्थ राजेंद्र दर्डा यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी प्रचार रॅली काढण्यात आली. दरम्यान, कॉर्नर सभेत राजेंद्र दर्डा यांनी नागरिकांशी संवाद साधला. एम.एम. शेख यांच्याविषयी बोलताना राजेंद्र दर्डा म्हणाले की, शेख यांनी नेहमीच औरंगाबादच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे. आपल्या भागाचे प्रश्न पोटतिडकीने मांडण्याचे काम ते नेहमीच करीत आले आहेत. औरंगाबादच्या मध्य विधानसभा मतदारसंघाचा विकास घडवून आणायचा असेल, तर शेख यांच्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन राजेंद्र दर्डा यांनीकेले. शेख आपल्या भाषणात म्हणाले की, औरंगाबाद मध्य मतदारसंघाच्या विकासाचा योजनाबद्ध आराखडा माझ्याकडे तयार आहे. सध्या चार दिवसांनी येणारे पाणी दिवसाआड सुरू करीन, लीजवर असलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लावेन आणि औरंगाबादला सुसज्ज महानगर बनविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शेख यांनी दिले. याप्रसंगी माजी महापौर सुदाम सोनवणे यांचेदेखील भाषण झााले.प्रचार रॅलीत काँग्रेसचे कार्यकर्ते आणि महिला प्रचंड संख्येने सहभागी झाल्या होत्या. रॅलीची सुरुवात आंबेडकर चौकातून झाली. रॅलीचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यात आले. शिवनेरी कॉलनी, रायगडनगर, प्रतापनगर, शिवाजीनगर, पवननगर, नेताजी सुभाषचंद्र बोसनगर, एन-९ एच-सेक्टर भागात रॅली काढण्यात आलेल्या रॅलीला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील गल्लीत रॅलीचा समारोप करण्यात आला. याप्रसंगी अ‍ॅड. इक्बालसिंग, अविनाश अंभोरे, प्रभाकर मुठ्ठे पाटील, दाते पाटील, योगेश हिवाळे, संजय कोल्हे, भरत निंभोरे, प्रमोद देशमुख यांच्यासह, काँग्रेसचे पदाधिकारी, नगररसेवक आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.