शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा पाणी प्रश्नावर आमदार संजय शिरसाट यांचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

By बापू सोळुंके | Updated: November 5, 2023 19:54 IST

 पाणी सोडण्यासाठी दरवेळी बैठकांची काय गरज

छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळू नये,  यासाठी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील  काही राजकीय  पुढारी जाणुनबूजन प्रयत्न करीत आहेत. आम्ही आमच्या हक्काचे पाणी मागतो, यामुळे सरकारने आमचा अंत पाहु नये, तात्काळ जायकवाडीच्या उर्ध्वभागातील धरणातून पाणी सोडावे, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल,अशा इशारा सत्ताधारी शिवसेना पक्षाचे प्रवक्ता तथा छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी दिला.  आ.शिरसाट यांनी त्यांचे हे आंदोलन सरकारविरोधात नसून नगर, नाशिक जिल्ह्यातील मराठवाडा द्वेषी पुढाऱ्यांविरोधात असल्याचे स्पष्ट केले.

आ. शिरसाट म्हणाले की, मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे, असा उच्च न्यायालयाचा निकाल आहे. असे असताना मराठवाड्याला पाणी मिळू नये,असे वाटणारे पश्चिम महाराष्ट्रातील काही राजकीय पुढारी  जाणूनबुजून  प्रयत्न करीत असल्याचे दिसते. आज जायकवाडी प्रकल्पात केवळ  ४५ टक्केच पाणीसाठा आहे. दोन महिन्यात हा साठा तळाला जाईल यानंतर  येणारा उन्हाळा मराठवाड्याचा विनाश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्ही हक्काचे पाणी द्या, अशी विनंती सरकारला करीत आहोत. मराठवाड्याला पाणी देण्यात येऊ नये, यासाठी काही जण कोर्टात गेल्याचे समजल्याने  आम्हीही सोमवारी कॅव्हेट दाखल करणार आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत पाणी प्रश्नावर बोलणे झाले. त्यांनी हक्काचे पाणी मिळेल असे सांगितले. पण दरवर्षी पाणी प्रश्नासाठी मराठवाड्याला भीक का मागावी लागते, हा आमचा प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले. 

आता मराठवाड्यातील सर्वपक्षीय  आमदार, खासदारांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून  रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. कोकणात वाहुन जाणारे पाणी मराठवाड्याला देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात दोन धरणे बांधली जात असल्याचे तेथील नेते सांगतात.मात्र ही दोन धरणे बांधूच नाही,अशी आमची भूमिका असल्याचे आ. शिरसाट यांनी स्पष्ट सांगितले. पाणी सोडण्यासाठी दरवेळी बैठकांची काय गरजमराठवाड्यात दरवर्षी होणाऱ्या १८ ते २० हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागचे पाणी हेच मूळ कारण आहे. यामुळे  सरकारला आमची हात जोडून विनंती आहे की, पाणी प्रश्नावर अंत पाहु नका, अन्यथा आमही सर्वजण रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही.  पाणी सोडण्यासाठी दरवेळी बैठक घेण्याची गरज काय,असा सवाल करीत बैठकीच्या नावावर पाणी उशीरा कसे सोडता येतील असा प्रयत्न केला जात असल्याचा आराेपही त्यांनी जलसंपदाच्या अधिकाऱ्यांवर केला. 

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSanjay Shirsatसंजय शिरसाट