शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
4
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
5
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
6
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
7
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
8
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
9
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
10
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
11
“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?
12
Akola Live in Partner killed: २८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...'
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारनं 'या' महत्त्वाच्या नियमांत केला बदल; १५ डिसेंबरपासून लागू होणार
14
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
15
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
16
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
17
प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप
18
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
19
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
20
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
Daily Top 2Weekly Top 5

आमदार जैस्वालांची मागणी,‘डॉ. सुक्रेंची बदली कराच’; मंत्री शिरसाट म्हणाले,‘बदली होणार नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 20:03 IST

शिंदेसेनेतील आमदार आणि मंत्र्यांमधील अंतर्गत कलह यानिमित्ताने पुन्हा चव्हाट्यावर आला.

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयाच्या अभ्यागत समितीचे अध्यक्ष आ. प्रदीप जैस्वाल यांनी अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांची बदली करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे लावून धरली आहे. दुसरीकडे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी गुरुवारी घाटीतील जिमखान्याच्या उद्घाटनप्रसंगी डाॅ. सुक्रे, काळजी करू नका, तुमची बदली होणार नाही, अशी ताकद दिली. शिंदेसेनेतील आमदार आणि मंत्र्यांमधील अंतर्गत कलह यानिमित्ताने पुन्हा चव्हाट्यावर आला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) जिमखाना इमारत व जिम साहित्याचे उद्घाटन पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डाॅ. अरविंद गायकवाड, डाॅ. एम. एस. बेग, हर्षदा शिरसाट, विजय वाघचौरे, मार्ड संघटनेचे अध्यक्ष डाॅ. ऋषिकेश देशमुख आदी उपस्थित होते. आ. जैस्वाल यांच्या सोहळ्यातील गैरहजेरीने शिंदेसेनेतील धुसफुसीवर नव्याने चर्चा सुरू झाली.

घाटीचे प्रभारी अधिष्ठाता डाॅ. शिवाजी सुक्रे यांच्या बदलीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मात्र, जिमखान्याच्या उद्घाटनप्रसंगी संजय शिरसाट म्हणाले, दोन वर्षांपूर्वीची घाटी आणि आताची घाटी यात खूप बदल झाला आहे. आता कोणी म्हणत नाही की, घाटी गरीब आहे. एक काळ असा होता की, डाॅ. सुक्रे की डाॅ. राठोड यांच्यामध्ये निवड करायची होती. त्यावेळी डाॅ. सुक्रेंची निवड केली. कोणतेही काम पॅशन म्हणून केले पाहिजे. ही दृष्टी इथे दिसते. डाॅ. सुक्रे, काळजी करू नका. तुमची बदली होणार नाही.

मी तलवार म्यान केलेली नाही : जैस्वालमी घाटीतील अनियमिततेप्रकरणी तलवार म्यान केलेली नाही. तेथील अनागोंदीची चौकशी करण्याच्या मागणीवर मी ठाम आहे. गुरुवारी जीमच्या उद्घाटनाचा कार्यक्रम अचानक ठेवला. मला निमंत्रण होते. मात्र, मी पाठदुखीमुळे जाऊ शकलो नाही. पालकमंत्री शिरसाट यांना बदली करण्याचे, थांबविण्याचे अधिकार आहेत. त्यांनी डॉ. सुक्रे यांना बळ दिले असले तरी मी तलवार म्यान केलेली नाही. माजी अभ्यागत समिती सदस्याच्या आरोपांच्या चौकशीची मागणी कायम आहे.- प्रदीप जैस्वाल, आमदार

शिरसाट यांनी उचलले ‘डंबेल्स’, सुक्रेंनीही पेलले वजनउद्घाटनानंतर संजय शिरसाट यांनी ‘डंबेल्स’ उचलले. यावेळी त्यांनी एक छोटे आणि एक मोठे डंबेल्स उचलले होते. संजय शिरसाट यांच्यासमोर डाॅ. शिवाजी सुक्रे यांनीही व्यायामशाळेतील एका मशीनवर वजन उचलले.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटPradeep Jaiswalप्रदीप जैस्वालgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी