शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

मिटमिटा, तीसगाव, आडगावला आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:15 AM

शहरातील कच-याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, या संदर्भात खंडपीठात याचिकाही दाखल झाली आहे. न्यायालयाच्या सूचनेनुसार मंगळवारी दुपारी महापालिका आयुक्त डी.एम. मुगळीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मिटमिटा येथील सफारीपार्कच्या जागेसह आणखी तीन ठिकाणी पाहणी केली. पाहणीच्या वेळी संतप्त गावक-यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. काहीही झाले तरी कचरा डेपो आमच्या परिसरात येऊ देणार नाही, असा गर्भित इशाराच गावकºयांनी दिला. पाहणीचा सविस्तर अहवाल उद्या बुधवारी न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देग्रामस्थ आक्रमक : औरंगाबाद मनपा आयुक्त, जिल्हाधिका-यांच्या पाहणीला कडाडून विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कच-याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, या संदर्भात खंडपीठात याचिकाही दाखल झाली आहे. न्यायालयाच्या सूचनेनुसार मंगळवारी दुपारी महापालिका आयुक्त डी.एम. मुगळीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मिटमिटा येथील सफारीपार्कच्या जागेसह आणखी तीन ठिकाणी पाहणी केली. पाहणीच्या वेळी संतप्त गावक-यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. काहीही झाले तरी कचरा डेपो आमच्या परिसरात येऊ देणार नाही, असा गर्भित इशाराच गावकºयांनी दिला. पाहणीचा सविस्तर अहवाल उद्या बुधवारी न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे.नारेगाव कचरा डेपोला पर्याय म्हणून आजपर्यंत महापालिकेने २५ पेक्षा अधिक जागांचा शोध घेतला. प्रत्येक ठिकाणी गावकºयांकडून होणारा विरोध लक्षात घेऊन मनपाने पुढचा निर्णयच घेतला नाही. मागील १३ दिवसांमध्ये मनपाने चार-पाच ठिकाणी कचरा टाकण्याचा प्रयत्न केला. कुठे राजकीय हस्तक्षेप झाला, तर कुठे गावकºयांनीच कचरा नको, अशी भूमिका घेतली.शहरातील कचरा प्रश्नावर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. आतापर्यंत दोन सुनावणी झाल्या आहेत. दुसºया सुनावणीत न्यायालयाच्या सूचनेनुसार मंगळवारी दुपारी युद्धपातळीवर जागांच्या पाहणीचा कार्यक्रम आखण्यात आला. सर्वप्रथम मिटमिटा येथील सफारी पार्क येथे पथक पोहोचले. पथकात उपायुक्त राहुल श्रीरामे, तहसीलदार आदींची उपस्थिती होती. सफारी पार्कच्या जागेवर कचरा अजिबात टाकू देणार नाही, अशी भूमिका पथकासमोर घेतली. त्यामुळे पथकाला बराच घाम फुटला. येथील ग्रामस्थांचा रौद्र अवतार पाहून पथकाने आडगाव येथे मोर्चा वळविला. येथील परिस्थिती अत्यंत भयानक होती. संतप्त ग्रामस्थांनीजिल्हाधिकारी, आयुक्तांच्या गाड्याच अडविल्या. आता पाहणीसाठी आलात म्हणून संयमाने घेत आहोत. उद्या बळाचा वापर केला तरी आमची तयारी आहे. कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी आमची असल्याचे गावकºयांनी नमूद केले. प्रशासनाकडे बळ आहे, तर आमच्याकडेही मोठे बळ असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पथकाने नंतर तीसगाव, करोडी येथील जागांचीही पाहणी केली.दरम्यान, पडेगाव, मिटमिटा भागातील गावकºयांनी मंदिरात आंदोलनाला सुरुवात केली असून, नागरिक ऐकण्यास तयार नाहीत. या भागात कचरा अजिबात टाकू देणार नाही, असे नगरसेवक रावसाहेब आमले यांनी सांगितले.तीसगावकरांनी पथकास पिटाळलेवाळूज येथील कचरा डेपोचा प्रयत्न फसल्यानंतर औरंगाबाद महापालिकेने आपला मोर्चा पुन्हा तीसगावच्या दिशेने वळविला आहे. तीसगाव परिसरात कचरा डेपो जागा पाहणी करायला मंगळवारी सायंकाळी आलेल्या पथकाला तीसगावकरांनीही पिटाळून लावले. यावेळी अधिकारी व नागरिकांत शाब्दिक चकमक उडाली.जिल्हा अधिकारी नवल किशोर राम, मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर, एसडीएम शशिकांत हदगल, तहसीलदार रमेश मुनलोड यांच्यासह पथकाने तीसगाव शिवारात येऊन कचरा डेपोसाठी जागेची पाहणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठ्या संख्येने गावकरी जमा होऊन रस्त्यावर उतरले व जोरदार घोषणाबाजी सुरू केली.जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चापथक माघारी फिरताच गावकºयांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात माजी जि.प. सदस्य रामचंद्र कसुरे व माजी सरपंच अंजन साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेतली. कचरा डेपोला तीव्र विरोध करून लवकरच जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. यावेळी सरंपच कौसाबाई कसुरे, उपसरपंच विष्णू जाधव, ग्रा.पं. सदस्य संजय जाधव, राजेश कसुरे, भूषण साळवे, संतोष दळे, कमलसिंग सूर्यवंशी, राजू कणिसे, मोहनसिंग सलापुरे, दौलत कसुरे, दिगंबर कसुरे, सुभाष कणिसे आदींसह गावकºयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.