लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जयसिंगपुरा येथे वसतिगृहात राहणा-या तरुणाचा एकतर्फी प्रेमातून त्याच्याच मित्राने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने मृताच्या रूममेटस्ने ‘गोल्याचा गेम केला’ असे सांगितले आणि तो थेट बेगमपुरा पोलीस ठाण्यात हजर झाला. एकतर्फी प्रेमातून शहरात पंधरा दिवसांत झालेली ही दुसरी हत्या आहे.गोल्या ऊर्फ अजय शत्रुघ्न तिडके (२२,रा. रामेश्वर अपार्टमेंट, जयसिंगपुरा,मूळ रा. शहापूर, ता. खामगाव,जि. बुलडाणा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मंगेश सुदाम वायव्हळ (२७,रा. पुणे, मूळ रा.समसापूर,जि.परभणी) असे आरोपीचे नाव आहे. सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर म्हणाले की, अजय ऊर्फ गोल्या व आरोपी मंगेश पाच-सहा वर्षांपासून मित्र होते. अजय हा मिलिंद महाविद्यालयात बी.एस्सी.तृतीय वर्षात शिकत होता. आरोपी मंगेशचे शिक्षण शहरातच बीबीएपर्यंत झाले. दोन वर्षांपासून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्याला राहत आहे. मंगेश आणि अजय हे चार वर्षे रूममेट होते. अजय हा मंगेशला मोठा भाऊ मानत. मंगेशही त्याला अभ्यासाविषयी सतत मार्गदर्शन करीत. दरम्यानच्या काळात अजयची एका मुलीशी मैत्री झाली. त्या मुलीला आरोपी ओळखत होता. तो तिला भेटलेला नव्हता. मात्र, अजयनेच स्वत:च्या फोनवरून तिचे आणि मंगेशचे बोलणे करून दिले होते. तेव्हापासून मंगेशला ती तरुणी आवडू लागली. मागील सहा महिन्यांपासून अजय आणि तिच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांच्यात सतत होणाºया गप्पा आणि भेटीगाठीचे वर्णन अजय मंगेशला फोनवरून सांगायचा. मंगेशला मात्र अजय व त्या मुलीचे प्रेमसंबंध मान्य नव्हते. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करू लागला होता. अजयला तिच्यापासून दूर करण्याच्या उद्देशाने तो ३१ मार्च रोजी पुण्याहून औरंगाबादेत आला. काही दिवस मित्राकडे राहिल्यानंतर दोन दिवसांपासून तो अजयच्या रू मवर आला.
एकतर्फी प्रेमातून औरंगाबादेत मित्राचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 11:15 IST
जयसिंगपुरा येथे वसतिगृहात राहणा-या तरुणाचा एकतर्फी प्रेमातून त्याच्याच मित्राने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.
एकतर्फी प्रेमातून औरंगाबादेत मित्राचा खून
ठळक मुद्देपहाटे साडेतीन वाजता घोटला गळा : जयसिंगपुऱ्याच्या खाजगी वसतिगृहातील खळबळजनक घटना; आरोपी स्वत: पोलिसांत हजर