शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'मिशन नॅक' पूर्ण, आता ऑनलाइन मूल्यांकन, उत्तरपत्रिकांची विद्यापीठात छपाईचे टार्गेट: कुलगुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 12:10 IST

कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांचा वर्षपूर्तीनिमित्त संवाद

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा पदभार स्वीकारला. त्यास शुक्रवारी वर्ष पूर्ण झाले. या वर्षभराच्या काळात विद्यापीठामध्ये किती तरी कामे करण्यात आली. त्यातून विद्यापीठाचा गाडा रुळावर आणण्यास मदत झाली आहे. आता आगामी काळात विद्यार्थ्यांची संख्या, ऑनलाइन मूल्यांकन आणि परीक्षेसाठी लागणाऱ्या उत्तरपत्रिकांची छपाई विद्यापीठातच करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या सभागृहात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल डॉ. फुलारी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रकुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर, वित्त व लेखाधिकारी सविता जंपावाड, डॉ. संजय कवडे, डॉ. संजय शिंदे यांची उपस्थिती होती. कुलगुरू म्हणाले, २४ जानेवारी २०२४ रोजी पदभार घेतल्यानंतर पहिली बैठक ‘नॅक’च्या संदर्भात होती. त्यानंतर मिशन नॅक पूर्ण केले. त्यात विद्यापीठाला अभूतपूर्व यश मिळाले. ‘ए प्लस’ दर्जा मिळाला. त्याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅंकींग फेमवर्कमध्येही विद्यापीठास ४६ वे रॅंकिंग मिळाले. त्याविषयी केंद्र शासनाच्या ‘पीएम-उषा’अंतर्गत १०० कोटी रुपये मिळाले. केमिकल टेक्नॉलॉजी विभागाला एनबीएचे मानांकन मिळाले. राज्य शासनाने छत्रपती शिवाजी अभ्यास केंद्राला ३ कोटींचा निधी मंजूर झाला. त्याशिवाय दीक्षांत सोहळा, इंद्रधनुष्य, आविष्कार, केंद्रीय युवा महोत्सव उत्साहात पार पडले. प्राध्यापक, कर्मचाऱ्यांना पदोन्नती, रजा रोखीकरण, सेवक कल्याण निधी, विद्यार्थी कलावंतांचा दैनंदिन भत्ता १२० वरून ३०० रुपये करण्यात आला. तासिका तत्त्वावर नेमणूक न करता पूर्णवेळ प्राध्यापकांच्या नियुक्त्याही वर्षभरात केल्या.

परीक्षा संचालक कायम राहणारविद्यापीठाच्या परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांनी राजीनामा दिल्याविषयी विचारले असता, राजीनामा स्वीकारण्यात येणार नसल्याचे फुलारी यांनी स्पष्ट केले. त्याच वेळी व्यवस्थापन परिषद सदस्याची अरेरावी वाढत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी योग्य ती कारवाई होईल, असे स्पष्ट करतानाच ‘सब्र का फल मिठा होता हैं’, असे स्पष्ट केले.

शैक्षणिक वातावरण कायम राहील विद्यापीठातील प्रत्येक व्यक्ती काम करीत आहे. त्यामुळे वातावरण अतिशय चांगले बनले असून, आगामी काळातही शैक्षणिक वातावरण कायम ठेवण्यात येईल.- डॉ. विजय फुलारी, कुलगुरू.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर