नवीन नांदेड : नोंदणीकृत फार्मासिस्ट म्हणून पूर्णवेळ काम करीत असल्याचे खोटे कागदपत्र व शपथपत्र कार्यालयात सादर करून शासनाची दिशाभूल केल्याच्या आरोपावरून अखेर दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, नांदेड येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक नामदेवराव भालेराव यांनी ४ मार्च रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. औषध निरीक्षक भालेराव यांच्या तक्रारीनुसार असर्जन येथील संदीप रावसाहेब देशमुख तसेच क्षितिजा पंडितराव देशमुख यांनी १६ डिसेंबर २०१० ते ५ डिसेंबर २०१२ या कालावधीत कृष्णाई मेडिकल अॅण्ड जनरल स्टोअर्स (जयप्रकाश नगर, असर्जन) येथे फार्मासिस्ट म्हणून पूर्णवेळ काम करणार असल्याचे खोटे तथा बनावट कागदपत्र कार्यालयात सादर केले.
बनावट कागदपत्राद्वारे शासनाची दिशाभूल
By admin | Updated: March 4, 2016 23:27 IST