शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 00:16 IST

लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्यानंतर तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणासह त्याला या गुन्ह्यात मदत करणाºया अन्य चार जणांना सिडको पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देआरोपी अटकेत : सिडको पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : लग्नाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्यानंतर तिच्यावर बलात्कार करणाऱ्या तरुणासह त्याला या गुन्ह्यात मदत करणाºया अन्य चार जणांना सिडको पोलिसांनी अटक केली.मधुसूदन बाजीराव राठोड (२०, रा. आविष्कार कॉलनी, सिडको) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्यात आरोपीसह त्याला मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याचे वडील बाजीराव राठोड, मित्र व्यंकटेश पाटील, सुमित मोकळे आणि एका मुलीला अटक केली आहे. याविषयी सिडको पोलिसांनी सांगितले की, सिडको परिसरातील १७ वर्षीय मुलगी आणि आरोपी मधुसूदन यांच्यात मैत्री होती. १२ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून जकातनाका येथे बोलावले. त्यानंतर तेथून तो तिला मोटारसायकलने क्र ांतीचौक परिसरात घेऊन गेला. तेथे त्याने त्याचा मित्र व्यंकटेश पाटीलला बोलावले आणि रात्रभर मुक्काम करण्यासाठी व्यवस्था करण्याचे सांगितले. व्यंकटेशने त्याचा मित्र सुमित मोकळेला ही बाब सांगितली. सुमितने त्यांना भावसिंगपुरा येथे बोलावल्याने तिघे भावसिंगपुरा चौकात गेले. तेथे सुमितने त्याच्या मैत्रिणीच्या खोलीवर नेले. मैत्रिणीला सांगून त्यांनी मधुसूदन आणि पीडितेची मुक्कामाची व्यवस्था केली. तेथे मुक्कामी असताना आरोपीने पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर दुसºया दिवशी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास व्यंकटेशने त्यांना पुण्याला जाणाºया बसमध्ये बसवून दिले. दरम्यान, १२ रोजी रात्रीच ही बाब पीडितेच्या वडिलांना समजताच त्यांनी आरोपीच्या वडिलांचे घर गाठले तेव्हा त्याने १३ रोजी सकाळी ११ पर्यंत तुमची मुलगी घरी येईल, तुम्ही पोलिसांत तक्रार करू नका, असे सांगितले; मात्र १३ रोजी दुपारी २ पर्यंत पीडिता न आल्याने पीडितेच्या नातेवाईकांनी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक झुंजारे, कर्मचारी निंभोरे, कदम आणि डोंगरे यांनी तपास करून आरोपींना शोधून काढले. आरोपीला पुण्याहून औरंगाबादला येण्यास भाग पाडले आणि पीडितेची मुक्तता केली. पीडितेच्या वैद्यकीय तपासणीअंती आणि जबाबानंतर आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदविला.