शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीला खोलीत डांबून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 17:55 IST

कन्नडमार्गे धुळ्याकडे पळून जाणाऱ्या आरोपींना पोलिसांनी पकडले

औरंगाबाद :  सोळावर्षीय तरुणीला मित्राच्या खोलीत डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना पुंडलिकनगर परिसरात घडली. आरोपीच्या तावडीतून सुटका करून घरी परतलेल्या तरुणीने वडिलांसह पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. तक्रार प्राप्त होताच पुंडलिकनगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत कन्नड तालुक्यातील रिठ्ठी मोढा येथे नराधमासह त्याच्या मित्राला पकडले.

नंदू ऊर्फ अनिल शेषराव शेलार (रा. हुसेन कॉलनी) आणि  प्रकाश रतन साप्ते (रा. पुंडलिकनगर), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, सोळावर्षीय तरुणी गतवर्षी दहावी नापास झाल्याने घरीच होती. आरोपी नंदू ऊर्फ अनिल शेलारच्या मित्राची ती मैत्रीण आहे. मित्रामुळे तिच्यासोबत काही दिवसांपूर्वी नंदूची ओळख झाली, तेव्हापासून नंदू तिच्या संपर्कात होता. दोघे आपसात बोलत, मात्र नंदूची तिच्यावर वाईट नजर असल्याचे तिला कधी समजलेच नाही. 

२७ मार्च रोजी तो तिला घेऊन मित्र प्रकाश साक्षेच्या  खोलीवर गेला.  तिला जिवे मारण्याची धमकी देत डांबून ठेवले. तिसऱ्या दिवशी रात्री नंदू तिला हुसेन कॉलनीतील समीर पटेल याच्या गच्चीवर घेऊन गेला आणि अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी परत प्रकाशच्या खोलीत आणून डांबले. ४ एप्रिल रोजी नंदूने पुन्हा पीडितेवर अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी तो बाहेरगावी जायचे असल्याचे सांगून निघून गेला. तिला मात्र खोलीबाहेर जाऊ देऊ नको असे प्रकाशला सांगितले. प्रकाशची नजर चुकवून तिने खोलीतून धूम ठोकली.

वडिलांसह घेतली पोलीस ठाण्यात धावमुलगी घरातून गायब झाल्यामुळे चिंताग्रस्त आई-वडील तिचा शोध घेत असताना ७ एप्रिल रोजी ती घरी आली आणि रडतच तिने आई-बाबांना तिच्यावरील अत्याचाराची माहिती दिली. या प्रकारानंतर तिला सोबत घेऊन वडील थेट पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आले. तेथे त्यांनी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांची भेट घेऊन तक्रार नोंदविली.

आरोपी जाणार होते कन्नड, धुळेमार्गे पुण्यालातक्रारीची गांभीर्याने दखल घेत सपोनि सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, कर्मचारी बाळाराम चौरे, राजेश यदमळ, रवी जाधव, जालिंदर मांटे, इम्रान अत्तार, विलास डोईफोडे यांच्या पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. तेव्हा आरोपी हे कन्नड तालुक्यातील रिठ्ठी मोढा येथे मित्राकडे असल्याचे समजले. पोलिसांनी मोढा येथे जाऊन त्यांना पकडले. मित्राकडून पैसे घेऊन ते हे धुळेमार्गे पुण्याला पळून जाणार होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी