शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या गुन्ह्यात दोघांना सश्रम कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:11 IST

औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरातील १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणारे फकीरचंद दाभाडे आणि पंढरीनाथ हिवर्डे या दोघांना ...

औरंगाबाद : मुकुंदवाडी परिसरातील १५ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणारे फकीरचंद दाभाडे आणि पंढरीनाथ हिवर्डे या दोघांना सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी प्रत्येकी सात वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठावला.अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी आधी मुलीच्या अपहरणाची तक्रार दिली होती. त्यानंतर १४ आॅगस्ट २०१५ रोजी त्यांनी पुरवणी जबाब नोंदविला की, फकीरचंद पांडुरंग दाभाडे (रा. मुकुंदनगर) याने दुचाकीवरून मुलीचे अपहरण केले. अल्पवयीन मुलीला दाभाडेने त्याचा मित्र पंढरीनाथ भीमराव हिवर्डे (रा. रांजणगाव) याच्या खोलीवर नेले. त्यानंतर दाभाडेने बजाजनगरमध्ये खोली किरायाने घेतली आणि तेथे राहू लागला. त्याच खोलीत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले. त्यानंतर पंढरीनाथ हिवर्डेच्या कारमधून बुलढाणा जिल्ह्यातील सुंदरवाडी येथे देवदर्शनाला नेले. फकीरचंद काही कामनिमित्त बाहेर गेला असता पंढरीनाथ हिवर्डेनेसुद्धा मुलीवर जबरदस्ती अत्याचार केल्याचे मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून फकीरचंद दाभाडे आणि पंढरीनाथ हिवर्डे या दोघांविरुद्ध भादंवि आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक ई. बी. वरे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकअभियोक्ता बाळासाहेब महेर यांनी १४ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यामध्ये अल्पवयीन मुलगी, तिचे वडील आणि घरमालकाची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने फकीरचंद दाभाडे आणि पंढरीनाथ हिवर्डे या दोघांनाही ‘सामूहिक अत्याचाराच्या’आरोपाखाली भादंवि कलम ३७६ डी, अन्वये प्रत्येकी सात वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड, तसेच ‘मुलीच्या अपहरणाच्या’ आरोपाखाली भादंवि कलम ३६६ अन्वये दोघांनाही प्रत्येकी सात वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५ हजार रुपये दंड ठोठावला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCourtन्यायालय