शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

सामाजिक न्याय खात्याला ७ हजार कोटींचा निधी कमी मिळाल्याने मंत्री संजय शिरसाट नाराज

By बापू सोळुंके | Updated: March 15, 2025 19:36 IST

लाडकी बहिणसाठी ४ हजार कोटी, पंतप्रधान आवास योजनेस १५०० कोटी तर ऊर्जा विभागासाठी १४०० कोटी निधी वर्ग केला.

छत्रपती संभाजीनगर : लाडकी बहिण योजना चांगलीच आहे. त्यासाठी पैसे दिले पाहिजे, यात दुमत नाही. पण सामाजिक न्याय व आदिवासी विभागाला राज्यघटनेच्या तरतुदीनुसार निधी दिला पाहिजे, यात कट मारता येत नाही, असे असताना लाडकी बहिण योजनेसाठी ४ हजार कोटी तर पंतप्रधान आवास ला १५०० कोटी आणि ऊर्जा विभागासाठी १४०० कोटी असे एकूण सात हजार कोटी देण्यात आले. याचा फटका सामाजिक न्याय विभागाला बसला, अशा शब्दात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली. 

सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी संवाद साधाला. ते म्हणाले की, आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय हे विभाग मागास लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आहेत. या खात्याला घटनेच्या तरतुदी नुसार निधी द्यावा लागतात. यात कट मारता येत नाही. लाडकी बहिणसाठी ४ हजार कोटी, पंतप्रधान आवास योजनेस १५०० कोटी तर ऊर्जा विभागासाठी १४०० कोटी दिल्याने आपल्या खात्याला एकूण ७ हजार कोटींचा फटका बसल्याचे त्यांनी नमूद केले. 

बीड जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीकडे लक्ष वेधले असता शिरसाट म्हणाले की, बीडमध्ये घडणाऱ्या घटना महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत. गुंडगिरी संपविण्याचे काम महायुती करीत आहे. बीडमध्ये गुंडांना त्यांची जागा दाखविली जाईल, असे संपर्कमंत्री म्हणून ग्वाही देत असल्याचे त्यांनी नमूद केले. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी समाजमाध्यमावर संतोष देशमुख प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकारी आणि न्यायाधिश एकत्र रंग खेळताना जो फोटो दाखवला तो गांभीर्याने घेण्यासारखा आहे. फोटो सत्य असेल तर सरकारने कारवाई केली पाहजे,असे त्यांनी नमूद केले. मराठवाड्यातील पाणी प्रश्नांकडे दुर्लक्ष झाल्याने येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचे ते म्हणाले. या प्रश्नांवर मराठवाड्यातील पक्षाचे आमदार यासाठी सरकारकडे बाजू मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

औरंगजेबाची कबर येथे कशाला?औरंगजेबची कबर काढण्यासाठी दम लागतो, असे संजय राऊत म्हणाले, याकडे लक्ष वेधले असता, शिरसाट म्हणाले की, कुणाचा दम काढता? अडीच वर्ष तुम्ही गोट्या खेळत होता का? पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरणारे तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता का? असा सवाल करीत आमच्या छत्रपती संभाजीराजेंना त्रास देणाऱ्यांची कबर येथे कशाला पाहिजे, ही कबर उखडून फेकायला हवी,अशी आमची स्पष्ट भूमिका असल्याचे मंत्री शिरसाट यांनी सांगितले.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटfundsनिधीladki bahin yojanaलाडकी बहीण योजना