शहरं
Join us  
Trending Stories
1
"ओऽऽऽ *** सर्वज्ञानी…" म्हणत, चित्रा वाघ यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर; दिला थेट इशार
2
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
3
'...तर दोन्ही देशातील संबंध सुधारणार नाहीत', भारत-चीन सीमावादावर जयशंकर स्पष्ट बोलले
4
विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार!
5
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
6
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
7
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
8
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
9
एका क्रिकेटवेड्या कपलची गोष्ट; 'Mr And Mrs Mahi' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
10
हे व्यावसायिक, ते ४०० कोटी कमावतात तरी...! KL Rahul ला झापणाऱ्या मालकावर वीरूचा तिखट वार
11
Mother's Day 2024: आनंद महिंद्रा भावूक! शेअर केला आईसोबतचा जुना फोटो; नेटकरी गहिवरले
12
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
13
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
14
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक
15
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
16
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
17
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
18
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
19
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
20
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट

पैठणमधील वडवाळी ग्रामपंचायतीवर मंत्री भुमरे गटाचे वर्चस्व; ठाकरे गटाचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2023 3:48 PM

चुरशीच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी स्वाती काळे विजयी

पैठण: पैठण तालुक्यातील एकमेव वडवाळी ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या समर्थक गटाचे वर्चस्व राहिले. राज्य जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे यांच्या शिवबालाजी ग्राम विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवला. प्रतिस्पर्धी (उबाठा गटाच्या) पॅनलला फक्त तीन जागेवर समाधान मानावे लागले.

वडवाळी गावात शिंदे गट व ठाकरे गट असे दोन पॅनल समोरासमोर उभे होते. गावकऱ्यांनी शिवसेना शिंदे गटाचे नंदलाल काळे यांच्यावर विश्वास टाकत त्यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला भरघोस मताने निवडून दिले. वडवाळी ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. सोमवारी तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाच्या सौ स्वाती किशोर काळे या सरपंच पदी निवडून आल्या. 

अत्यंत चुरशीच्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सौ स्वाती काळे (७१०) यांनी विरोधी उमेदवार प्रतिभा खोपडे (६४२) यांचा  ६८ मतांनी पराभव केला. अन्य विजयी उमेदवारात मंगलाबाई पाचे, संगीता मैंदड, गणेश शिंदे, छाया गायकवाड, प्रियंका जाधव, अमोल बर्डे, प्रभाकर पाचे व रितू गायकवाड यांचा समावेश आहे. इतर चार ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत शंकर थोरे ( पारूंडी), परवेज बागवान ( पाचोड बु), कोमल गिरगे ( नायगाव) व राहूल बनकर ( आडूळ बु ) यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांचा पराभव करीत विजय संपादीत केला.  

विजयी पॅनलच्या उमेदवारांनी समर्थकासह पैठण शहर व वडवाळी गावात गुलालाची उधळण आणि फटाक्यांची अतिषबाजी करीत जल्लोष साजरा केला. यावेळी दूध संघाचे नंदलाल काळे, अरुण पाटील काळे,  अशोक बरडे, गणेश पवार, उत्तमराव जाधव, सखाराम शिंदे, बळीराम जाधव, पांडुरंग जाधव, भिमराव गायकवाड, रमेश घोंगडे, रामनाथ घोंगडे, शाम काळे, भगवान मैदड आदी उपस्थित होते. विजयाबद्दल पालकमंत्री संदिपान भुमरे व युवा नेते विलास भुमरे यांनी नवनिर्वाचित सरपंच स्वाती किशोर काळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादSandeepan Bhoomraसंदीपान भुमरे