शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री अतुल सावे यांचा ताफा मराठा कार्यकर्त्यांनी अडविला

By बापू सोळुंके | Updated: October 29, 2023 00:20 IST

Atul Save: मराठा आरक्षणाचे मागणीसाठी राज्यभर मराठा समाज आक्रमक झालेला दिसतोय .याचा अनुभव शनिवारी रात्री गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनाही आला.

- बापू सोळुंके  छत्रपती संभाजीनगर - मराठा आरक्षणाचे मागणीसाठी राज्यभर मराठा समाज आक्रमक झालेला दिसतोय .याचा अनुभव शनिवारी रात्री गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनाही आला. जय भवानी नगर येथे एका कार्यक्रमासाठी ते आले असता मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाचा ताफा अडविला .यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

या घटनेविषयी प्राप्त माहिती नुसार राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे हे शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जय भवानी नगर येथे एका कार्यक्रमासाठी आले होते .याविषयी माहिती मिळतात या परिसरात मोठ्या संख्येने असलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सावे यांच्या कार्यक्रमाकडे धाव घेतली .तोपर्यंत कार्यक्रम संपुन सावे हे निघत असताना कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाचा ताफा अडविला. यावेळी त्यांच्यासोबत असलेले भाजपचे पदाधिकारी संजय केणेकर यांनी कार्यकर्त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला .मात्र कोणी त्यांच ऐकण्याचे मनस्थितीत नव्हते .मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तुम्ही काय केले, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी तुम्ही सरकारमध्ये असूनही आवाज का उठवीत नाहीत? अशा प्रश्नांचा भडीमार कार्यकर्त्यांनी सावे यांच्यावर केला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी सावे यांच्या वाहनांच्या समोर लोटांगण घेतले .कार्यकर्ते जय भवानी ,जय शिवाजी ,एक मराठा, लाख मराठा मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत होते .यावेळी सावे हे त्यांचा ताफा तेथे सोडून एका कार्यकर्त्याच्या दुचाकी वर बसून तेथून निघून गेल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शनी दिली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAtul Saveअतुल सावे