औरंगाबाद : महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये मजलिस- ए- इत्तेहाद- उल- मुस्लिमिन (एमआयएम) पक्षाचे चार सदस्य आहेत. पक्षाचे आ. इम्तियाज जलील यांनी स्थायी समितीमधील दोन जुन्या सदस्यांचे पक्षाने राजीनामे घेतले आहेत, उद्या चार नवीन सदस्य पाठविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. स्थायी समिती सदस्य निवडीची प्रकिया संपल्यावर एमआयएमने महापौरांना दोन नगरसेवकांचे राजीनामे सादर केले. निवडणूक प्रक्रिया संपल्याचे कारण दाखवीत महापौरांनी राजीनामे थेट विधि विभागाकडे पाठवून दिले. शिवसेनेला सभापतीपद मिळू नये म्हणून एमआयएमने ही नवीन खेळी केल्याची चर्चा आता मनपा वर्तुळात रंगत आहे.मंगळवारी सकाळी १० वाजता मनपाच्या सभागृहात स्थायी समितीच्या सदस्यांची निवडणूक सुरू असताना एमआयएमचे गटनेते सिद्दीकी यांनी महापौरांना दोनच नावे दिली. याचवेळी त्यांनी समिना शेख आणि विकास एडके यांचे राजीनामे महापौरांना सादर केले नाहीत. संपूर्ण निवडणूक प्रकिया संपल्यावर एमआयएमकडून दोन राजीनामे सादर करण्यात आले. या दोन सदस्यांना सभापतीपदाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार (पान २ वर)स्थायी समितीमध्ये दरवर्षी चार सदस्यांना संधी मिळावी या हेतूने एमआयएमने नवीन पायंडा पाडला आहे. आज स्थायी समितीमध्ये दोन नवीन सदस्य गेले आहेत. शेख समिना, विकास एडके यांचे राजीनामे मंजूर होतील. त्यानंतर शेख जफर आणि सरवत बेगम आरेफ हुसैनी हे दोन सदस्य आत जातील. राजीनामे उशिरा सादर झाले यामागे कोणतेही राजकीय षड्यंत्र नाही.इम्तियाज जलील, आमदार, एमआयएम४एमआयएमचे गटनेते नासेर सिद्दीकी यांनी सांगितले की, माझ्याकडे सकाळी १० वाजता दोन नवीन सदस्यांची नावे आली. त्यानंतर राजीनामे दिलेले पत्र पक्षाकडून प्राप्त झाले. जेव्हा मला पत्र मिळाले त्यानंतर लगेच मी सभागृहात सादर केले. माझ्याकडून कोणताही विलंब झाला नाही. पक्षाकडून उशिराने राजीनामे आले.स्थायी सदस्य म्हणून भाजपला मंगळवारी दोन नवीन नावे द्यायची होती. महापालिकेतील नेत्यांनी पक्षादेश डावलून नगरसेवक राज वानखेडे यांची वर्णी लावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.४स्थायी समितीचे मावळते सभापती दिलीप थोरात यांनी पुन्हा एकदा स्थायीत जाण्यासाठी आ. अतुल सावे यांच्या माध्यमातून जोरदार फिल्डिंग लावली होती. महापालिकेतील स्थानिक नेत्यांनी परस्पर राज वानखेडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यासंदर्भात शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी सांगितले की, पक्षानेच दोन्ही नावे दिली होती. ४शहर विकास आराखड्याच्या समितीमध्ये हुकमी एक्का असावा म्हणून भाजप नेत्यांनी ही खेळी केल्याची चर्चाही मनपा वर्तुळात आहे. औरंगाबाद : महापालिकेतील स्थायी समिती सदस्य निवडीसाठी मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत एकूण आठ नवीन सदस्य निवडण्यात आले. शिवसेनेने नंदकुमार घोडेले, राजू वैद्य आणि विकास जैन या तीन ज्येष्ठ नगरसेवकांना डावलून सुरेवाडी येथील नगरसेवक सीताराम सुरे यांची वर्णी लावली. त्यामुळे सभापतीपदाचा गुंता अधिक वाढला आहे.मंगळवारी सकाळी १० वाजता महापौर त्र्यंबक तुपे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. सर्व राजकीय पक्षांच्या गटनेत्यांनी स्थायी समितीत पाठविण्यात येणाऱ्या सदस्यांची यादी महापौैरांना सादर केली. ११ वाजता महापौरांनी स्थायी समितीसाठी निवडण्यात आलेल्या आठ सदस्यांची घोषणा केली. शिवसेनेतर्फे अचानक सीताराम सुरे यांना संधी देण्यात आली. भाजपतर्फे राजगौरव वानखेडे, मनीषा मुंडे यांची निवड करण्यात आली. एमआयएमकडून अजीम अहेमद, संगीता सुभाष वाघुले, तर अपक्षांच्या गटातून कैलास गायकवाड, कीर्ती शिंदे यांची वर्णी लागली. काँग्रेसतर्फे सोहेल शकील खान यांची निवड करण्यात आली. सुरे यांनी स्थायीचे सदस्यत्व मिळविण्यासाठी फारशी फिल्डिंगही लावली नव्हती.स्थायी समितीत शिवसेनेचे अगोदरच पाच सदस्य आहेत. आज सीताराम सुरे यांच्या निमित्ताने सहाव्या सदस्याची निवड करण्यात आली. शिवसेना-भाजप युतीमधील करारानुसार यंदा स्थायी समिती सभापतीपद सेनेच्या कोट्याला आले आहे. स्थायीत युतीला स्पष्ट बहुमतही आहे. सेनेतील सहापैकी एका सदस्याच्या गळ्यात सभापतीपदाची माळ पडणार हे निश्चित. या सहा जणांमध्ये ज्येष्ठ नगरसेवक मोहन मेघावाले यांनीही सभापतीपदावर दावा ठोकला आहे. नवीन चेहरा म्हणून मकरंद कुलकर्णी यांना संधी द्यावी, ओबीसी मतांना डोळ्यासमोर ठेवून सीताराम सुरे यांचाही विचार होऊ शकतो.ज्येष्ठ सदस्यांची गोचीस्थायी समितीत जाण्यासाठी सेनेतील ज्येष्ठ सदस्य नंदकुमार घोडेले, विकास जैन, राजू वैद्य यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. या तिन्हीपैकी कोणी एक जण स्थायी सदस्य म्हणून आत जाईल आणि तोच सभापती बनेल, असा कयास लावण्यात येत होता. शिवसेनेच्या तिन्ही ज्येष्ठ नगरसेवकांना (पान २ वर)
एमआयएमचा भाजपधार्जिणा डाव
By admin | Updated: May 11, 2016 01:02 IST