शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएमचा औरंगाबादच्या सिटीचौक पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:30 IST

गेल्या महिन्यात झालेल्या दंगलीतील युवकांना पुन्हा दुस-या गुन्ह्यात सिटीचौक पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लमिनच्या (एमआयएम) कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी सिटीचौक पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी करीत साडेतीन तास ठिय्या दिला.

ठळक मुद्देदुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्याचा संताप : आयुक्तांच्या आवाहनानंतर जमाव पांगला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : गेल्या महिन्यात झालेल्या दंगलीतील युवकांना पुन्हा दुस-या गुन्ह्यात सिटीचौक पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लमिनच्या (एमआयएम) कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी सिटीचौक पोलीस ठाण्यासमोर जोरदार घोषणाबाजी करीत साडेतीन तास ठिय्या दिला.या घटनेमुळे सिटीचौक, शहागंज, जुनाबाजार परिसरातील काही दुकाने व्यापाºयांनी बंद केली. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी जमावाला शांततेचे आवाहन केल्यावर तणाव निवळला.दंगलीचे गुन्हे दाखल असलेल्या युवकांना अलीकडेच जामीन मिळाला होता. त्यानंतर मंगळवारी पोलिसांनी त्यांना दंगलीच्या अन्य दुसºया गुन्ह्यात (पोलीस निरीक्षकावर हल्ला) ताब्यात घेतले.सायंकाळी उशिरा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अंजूम शेख यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे एमआयएमचे कार्यकर्ते संतप्त झाले व मोठ्या संख्येने सिटीचौक ठाण्यासमोर जमा झाले.ताब्यात घेतलेल्या युवकांना सोडून द्यावे, अशी मागणी करीत दुपारी २ वाजेपासून एमआयएम कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यानंतर एमआयएमचे आ. इम्तियाज जलिल यांच्यासह पदाधिकाºयांनी शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त यांच्याशी चर्चा केली.दंगलप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपीविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांकडून एका समाजावर अन्याय करण्याचा प्रश्नच नाही, तसेच कुणीही गदारोळ करू नये. शांतता राखावी. त्यासाठी शिष्टमंडळानेच नागरिकांना शांततेचे आवाहन करावे, असेही आयुक्तांनी आवाहन केले. त्यानंतर ठाण्यासमोरील जमाव हळूहळू पांगला.दरम्यान संतप्त जमाव ठाण्यावर आल्यामुळे हत्यारबंद पोलीस कुमक, वज्रवाहन, बुलेट प्रूफ जाकिटसह पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसArrestअटकagitationआंदोलन