शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएम नगरसेवकांनी तोडला कर्मचाऱ्याचा पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 22:43 IST

बारी कॉलनी भागात अनधिकृत नळ घेण्यात येत असल्याची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता ए.एस. मोरे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मोबाईलद्वारे अनधिकृत नळ घेत असल्याचे फोटो मोबाईलवर काढण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरातील एमआयएम नगरसेवकांनी मोरे यांना चक्क बेदम मारहाण करून त्यांचा पायच फ्रॅक्चर केला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.

ठळक मुद्दे शाखा अभियंता बेशुद्ध : बारी कॉलनी भागातील घटना

औरंगाबाद : बारी कॉलनी भागात अनधिकृत नळ घेण्यात येत असल्याची माहिती मिळताच पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता ए.एस. मोरे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मोबाईलद्वारे अनधिकृत नळ घेत असल्याचे फोटो मोबाईलवर काढण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरातील एमआयएम नगरसेवकांनी मोरे यांना चक्क बेदम मारहाण करून त्यांचा पायच फ्रॅक्चर केला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेमुळे महापालिकेतील कर्मचाºयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.माजी सनदी अधिकारी रत्नाकर गायकवाड यांचे जावई असलेले ए.एस. मोरे अत्यंत शांत आणि मृदू स्वभावाचे आहेत. बारी कॉलनी भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळ घेण्यात येत असल्याची माहिती गुरुवारी दुपारी त्यांना मिळाली. कामात अत्यंत प्रामाणिक असलेले मोरे एकटेच घटनास्थळी पोहोचले. आपल्या मोबाईल कॅमेºयात फोटो काढण्यास त्यांनी सुरुवात केली. अचानक एमआयएम नगरसेवकाने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून अक्षरश: फोडून टाकला. कार्यकर्त्यांनी पाठीमागून त्यांच्यावर काठीने हल्ला चढविला. हा हल्ला वाचविण्याचा मोरे यांनी बराच प्रयत्न केला. त्यांचा पाय फ्रॅक्चर होईपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आली. बेशुद्धावस्थेत त्यांना पोलीस आयुक्त कार्यालयासमोरील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोरे आज शुद्धीवर आले. त्यांनी अद्याप पोलिसांकडे तक्रार दिलेली नाही. तक्रार देऊ नये म्हणून एमआयएम नगरसेवकांकडून त्यांच्यावर प्रचंड दबाव टाकण्यात येत आहे. दुचाकीवरून पडल्याने जखमी झालो, पाय मोडला असे पोलिसांना, महापालिका अधिकाºयांना सांगा, असा दबाव टाकण्यात येत आहे. दरम्यान, कामगार नेते कृष्णा बनकर यांनी सांगितले की, चार दिवसांपूर्वीच एन-५ पाण्याच्या टाकीवर चार कर्मचाºयांना बेदम मारहाण करण्यात आली. आता शाखा अभियंत्याला टार्गेट करण्यात आले. सोमवारी महापालिका कर्मचारी कामबंद आंदोलन करणार असल्याचे बनकर यांनी नमूद केले. मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक, महापौर नंदकुमार घोडेले यांनी शाखा अभियंत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाCrime Newsगुन्हेगारी