शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएम-काँग्रेस राडा: काँग्रेस उमेदवार हबीब कुरेशी, कलीम कुरेशीसह ५० जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 14:24 IST

प्रसंगावधान राखून पोलिसांकडून लाठीचार्ज; पाेलिसांसह एकमेकांवर अंडे फेकले, २५ मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात

छत्रपती संभाजीनगर : एमआयएम व काँग्रेसचे उमेदवार प्रचार रॅलीत समोरासमोर येऊन बुधवारी दुपारी १.३० वाजता खासगेट परिसरात राडा झाला. यात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना मारहाण करून वाहनाचा पाठलाग करण्यात आला. पोलिसांनी वेळीच लाठीचार्ज केल्याने परिस्थिती नियंत्रणात येत मोठा अनुचित प्रकार टळला. याप्रकरणी जिन्सी पोलिसांनी रात्री काँग्रेसचे उमेदवार हबीब कुरेशी, त्यांचे भाऊ कलीम कुरेशी यांच्यासह ५० जणांच्या जमावावर गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी शासनातर्फे फिर्यादी होत गुन्हा नोंदवला. एमआयएमचे उमेदवार फेरोज खान मोईनोद्दीन (रा. बक्कलगुडा, शहागंज) यांनी ७ जानेवारी रोजी प्रभाग १४ मध्ये परवानगी घेऊन बायजीपुरा ते नवाबपुरा चौका दरम्यान पायी प्रचार रॅली काढली होती. सकाळी १० वाजता त्यांच्या रॅलीला सुरुवात झाली. त्यात माजी खासदार इम्तियाज जलील हे देखील सहभागी झाले. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास अचानक जिन्सी चौकातून काँग्रेसचे कलीम कुरेशी, हबीब कुरेशी, शकील कुरेशी, आवेज शकील यांच्यासह ४० ते ५० जणांचा जमाव रस्त्यावर आला.

हातवारे, घोषणाबाजी, अंडे फेकले-प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, दोन्ही गट समोरासमोर येताच जमावातील तरुण एकमेकांना पाहून हातवारे, घोषणाबाजी करत होते. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी सर्वांना घरी जाण्याचे आवाहन केले. मात्र, जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.-दोन्ही गट एकमेकांवर चालून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, जिन्सीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत व अन्य पोलिस त्यांना अडवण्याचा कसोशीने प्रयत्न करत होते.-जमावाने एकमेकांना शिवीगाळ सुरू केल्याने तणाव वाढला. जमाव पोलिसांच्या हाताबाहेर गेला. एकमेकांवर धावून जात मारहाण सुरू झाली. काही व्यापाऱ्यांनी तत्काळ दुकानांचे शटर बंद केले.

काही क्षणांत जमावातून अज्ञातांनी एकमेकांवर अंडे फेकण्यास सुरुवात केली. पोलिसांवरही अंडे फेकण्यात आले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी दोन वेळेस शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, जमावाने ऐकले नाही. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनाचा पाठलाग करुन त्यांना मारहाण करण्यात आली. पोलिसांनाच धक्काबुक्की सुरू झाल्याने बुधवत यांनी सहकाऱ्यांसह जमावावर लाठीचार्ज केला. त्यानंतर जमाव पांगून परिस्थिती नियंत्रणात आली.

या कलमान्वये गुन्हा दाखलशासनाच्या वतीने पोलिस अंमलदार शेख शफिक मसलोद्दीन यांच्या तक्रारीवरुन बीएनएस १३२ ( सरकारी कामात हस्तक्षेप), १८९-२ (बेकायदेशीर जमाव), १९१-२(दंगा करणे), १९०(बेकायदेशीर जमाव), १२६-२(गैरकृत्य), ११५-२(इच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे), ३५२ (शांतताभंग घडवून आणण्यासाठी अपमानित करणे), ३५१-२,३ (धाकपटशाही) सह कलम महाराष्ट्र पोलिस अधिनियम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक अरुणा घुले यांच्याकडे याप्रकरणाचा तपास सोपवण्यात आला.

English
हिंदी सारांश
Web Title : MIM-Congress Clash: Case Filed Against Congress Candidate, 50 Others

Web Summary : Clash erupted between MIM and Congress rally in Chhatrapati Sambhajinagar. Police filed a case against Congress candidate Habib Qureshi and 50 others for rioting and assault after violence broke out. Imtiaz Jaleel was allegedly attacked during the clash. Police used lathi charge to control the mob.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६